रोहयो कामांवर ८ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:02 AM2018-04-26T01:02:02+5:302018-04-26T01:02:02+5:30

8 thousand laborers on Roho works | रोहयो कामांवर ८ हजार मजूर

रोहयो कामांवर ८ हजार मजूर

Next

जालना : जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामांना आता मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. आज घडीला ४५५ कामांवर जवळपास आठ हजार ३२४ मजुरांची उपस्थिती असल्याचे सांगण्यात आले.
ही कामे करताना कुशल आणि अकुशल अशी विभागनी करण्यात आली आहे. अकुशल कामांची संख्या ही १०८ असून, कुशल कामे सध्या सुरू झाले नसल्याचे सांगण्यात आले. सध्या शेतीमध्ये देखील हवी तेवढी कामे उपलब्ध नसल्याने अनेकांच्या हाताला कामाची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन रोजगार हमी विभागाने स्वंतत्र आराखडा तयार केला आहे.
यात जिल्ह्यातील ७७९ ग्रामपंचायतींपैकी केवळ १६३ ग्रामपंचपायतीतच ही कामे सुरू आहेत. यात तालुकानिहाय कामे आणि मजुरांची उपस्थिती अशी आहे. अंबड १२७ - (१७२७), बदनापूर ३४ - (५२६), भोकरदन ६९ - (१४९५), घनसावंगी ५६- (९९१), जाफराबाद २१-(२२९७), जालना ७९- (७३२), मंठा २२ - (१०९), आणि परतूर ४७ - (४७७) अशी आहे. कंसा बाहेरील आकडे त्या तालुक्यात सुरू असलेली कामे दर्शवितात तर कंसातील आकडे हे त्या कामांवर असलेल्या मजुरांची संख्या आहे.
कडक उन्हातही काम
सध्या जालना जिल्ह्यात उन्हाचा पारा हा ४० ते ४१ अंशावर पोहोचलेला आहे. असे असतानाही रोजगार हमी योजनेवरील मजूर हे पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हाची तमा बाळगत नसल्याचे दिसून आले. मजुरांना कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
प्रशासन : मजुरांची संख्या वाढल्यास नियोजन तयार
रोजगार हमी योजनेच्या कामावर जिल्ह्यात आठ हजार मजूर सध्या कार्यरत आहेत. परंंतु भविष्यात आणखी मागणी वाढल्यास रोजगार हमी विभागाने त्याची पूर्ण तयारी केली आहे. कुशल तसेच अकुशल कामांचे नियोजन हे त्या ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार ठरणार असल्याचे उपजिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.

Web Title: 8 thousand laborers on Roho works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.