सव्वा लाख शेतक-यांना आठशे कोटींची कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:34 AM2017-12-23T00:34:31+5:302017-12-23T00:34:37+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख २५ हजार ४३७ लाभार्थी शेतक-यांना ७९४ कोटी २ लाख ८४ हजार रुपये विविध बँकांना वर्ग करण्यात आले आहेत. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख २५ हजार ४३७ लाभार्थी शेतक-यांना ७९४ कोटी २ लाख ८४ हजार रुपये विविध बँकांना वर्ग करण्यात आले आहेत. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख ९७ हजार शेतक-यांनी आपले सरकार पोर्टलवर आॅनलाईन अर्ज केले होते. तर बँकांनी तीन लाख १२ हजार शेतक-यांची माहिती आॅनलाईन पोर्टलवर भरली होती. कर्जमाफीस पात्र एकही शेतकरी लाभापासून वंचित राहू नये यासाठी शेतक-यांच्या अर्जातील माहितीची बँकेकडील माहितीच्या आधारे शहानिशा करून त्याची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये तालुका स्तरावर सहायक निबंधक, जिल्हा विशेष लेखा परीक्षक, मध्यवर्ती बँकेचे अधिकारी, राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. पात्र शेतक-याच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग केली जात असून, आतापर्यंत एक लाख शेतक-यांच्या खात्यावर सहाशे कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.