जालना जिल्ह्यात ८१ बाधितांची भर; एका रुग्णाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 07:31 PM2020-08-25T19:31:54+5:302020-08-25T19:32:13+5:30

जालना जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२२३ वर

81 affected in Jalna district; Death of a one patient | जालना जिल्ह्यात ८१ बाधितांची भर; एका रुग्णाचा मृत्यू 

जालना जिल्ह्यात ८१ बाधितांची भर; एका रुग्णाचा मृत्यू 

Next
ठळक मुद्देआतापर्यंत १२७ जणांचा बळी गेला आहे

जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या देऊळगाव मही येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ८१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या ८७ जणांनाही रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीवर जालना येथील कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना मंगळवारी त्या रूग्णाचा मृत्यू झाला. तर मंगळवारीच ८१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील सोनल नगर १, सुखशांती नगर ३, आनंदवाडी १, मोदीखाना २, सामान्य रुग्णालय परिसरातील १, गांधी चमन १, श्रीकृष्ण रुख्मिणी नगर १, सकलेचा नगर १, शिवनगर २, फुकटपुरा १, संभाजीनगर १, मिलनत नगर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर  भोकरदन शहरातील २, शेलूद ३, श्रीकृष्ण मंदिर अंबड २, शेवगा १, खासगाव १, देऊळगाव उगले १, रुई १, सिंदखेडराजा १, रामनगर  कारखाना १, इंदिरानगर १, आष्टी १, म्हाडा कॉलनी अंबड ३, शेलगाव १, सिरसवाडी १, दुधना काळेगाव १, जाफराबाद ३, अकोला १, बदनापूर ३, घनसावंगी १, तांदुळवाडी १, नूतन वसाहत अंबड १, सेलू जि. परभणी १, विडोळी ता. मंठा १, अक्षय कॉलनी मंठा ३, मंठा २, मार्केट यार्ड मंठा १, दावलवाडी १, आंदरुड ता. मेहकर १, नेर २, चिंचोली १, माळी गल्ली अंबड १, सायगाव १, चिंचखेडा १, अंबेकर नगर जाफाराबाद येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अँटिजन तपासणी अहवालातून १८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचेही समोर आले आहे.

३२ जणांवर दंडात्मक कारवाई
मास्कचा वापर न करणे, सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन न करणाऱ्या ३२ जणांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून ६२०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या ४२८२ जणांवर आजवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांकडून ९ लाख १० हजार ८६० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

बाधितांची संख्या ४२२३ वर
जालना जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२२३ वर गेली असून, त्यातील १२७ जणांचा बळी गेला आहे. तर रूग्णालयातील यशस्वी उपचारानंतर २९८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title: 81 affected in Jalna district; Death of a one patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.