व्यापाऱ्यास मारहाण करून ८१ हजार लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:19 AM2020-02-16T00:19:42+5:302020-02-16T00:20:13+5:30
औषधी दुकानातील पैशांची बॅग घेऊन घराकडे जाणाºया व्यापाºयास मारहाण करून ८१ हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : औषधी दुकानातील पैशांची बॅग घेऊन घराकडे जाणाºया व्यापाºयास मारहाण करून ८१ हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शुक्रवारी रात्री शहरातील निर्मळनगर कॉलनीतील नेत्रसेवा हॉस्पिटलजवळ घडली.
मंठा रोडवरील नेत्रसेवा हॉस्पिटलच्या बाजूला रामेश्वर उमाकांत कौटकर यांचे औषधी दुकान आहे. रामेश्वर कौटकर हे शुक्रवारी रात्री औषधी दुकानातील ८१ हजार ५०० रूपये असलेली बॅग घेऊन दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी निर्मळ कॉलनी भागात आली असता दुचाकीसमोर आलेल्या अनोळखी तिघांनी हातावर लाकडी दांड्याने मारहाण ८१ हजार ५०० रूपये किमतीची पैशाची बॅग घेऊन पळ काढल्याची तक्रार कौटकर यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात दिली. कोटकर यांच्या या तक्रारीवरून अनोळखी तिघा चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोउपनि मोतीराम बगाड हे करीत आहेत.