शिख गुरूद्वारासाठी ९० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:01 AM2018-12-29T00:01:41+5:302018-12-29T00:02:39+5:30
नांदेड शिख गुरूद्वारा सचखंड श्री हूजूरसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. ६१ मतदारांपैकी ५५ जणांनी मतदांनाचा हक्क बजावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : नांदेड शिख गुरूद्वारा सचखंड श्री हूजूरसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. ६१ मतदारांपैकी ५५ जणांनी मतदांनाचा हक्क बजावला. या निवडणूकीसाठी एकूण ९०.१६ टक्के मतदान झाले.
परतूर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर मतदारांची संख्या ६१ आहे. सांयकाळी साडेचार वाजेपर्यंत ५५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मताची टक्केवारी ९०.१६ आहे. ही निवडणूक नांदेड शिख गुरूद्वारा सचखंड श्री अपच नगर साहिब मंडळ २०१८ साठी होत आहे. या मंडळासाठी जिल्ह्यात ५९५ मतदारांची संख्या आहे. जालना २८०, अंबड १८, मंठा २०८, घनसावंगी २८, परतूर ६१ अशी एकूण ५९५ मतदारांची संख्या आहे. या केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून नायब तहसीलदार व्ही. पी. दावणगावकर यांनी काम पाहिले, तर एम. ए. चाउस, बी. व्ही. बेले, ए. पी. देशपांडे यांनी मदतकेली. यावेळी सहाय्यक पोनि. पवार, पो. कॉ. कोकणे यांनी बंदोबस्त ठेवला होता.