अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानीचे अर्धनग्न आंदोलन
By महेश गायकवाड | Published: March 20, 2023 05:41 PM2023-03-20T17:41:48+5:302023-03-20T17:42:21+5:30
दहा दिवसांत पीकविमा जमा करण्याचे आश्वासन
जालना : अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी तसेच पीकविमा रक्कम तातडीने खात्यावर वर्ग करावी. या मागण्यांसाठी जाफराबाद शहरातील कृषी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयूर बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कडक उन्हात कपडे काढून पाच तास हे आंदाेलन सुरू होते.
या आंदोलनाची कृषी कार्यालयाने दखल घेत दहा दिवसांत पीकविमा जमा केला जाईल. न केल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करू. तसेच गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ केले जाईल, अतिवृष्टीचे अनुदानदेखील खात्यात जमा केले जाईल. असे आशयाचे लेखी पत्र आंदोलकांना देण्यात आले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष भोपळे, उपाध्यक्ष गजानन भोपळे, हनुमंत मुरकुटे, नारायण भोपळे, अमोल कन्नर, विष्णू कदम, समाधान कन्नर, राजू गायकवाड, ज्ञानेश्वर सरोदे, समाधान भोपळे, दिलीप बकाल, जीवन टेलर, रामेश्वर शेवत्रे, समाधान खिल्लारे, अरीफ शाहा, शंकर भोपळे, केशव भोपळे, समाधान इंगळे, संतोष इंगळे, गणेश भोपळे, दादाराव भांबळे, आंनद भिसे, माधू भिसे, मंगेश म्हस्के, सुनील म्हस्के, राजू खेडेकर, भोपळे बाबा, नामदेव गायकवाड, अमोल गायकवाड, अंकुश गायकवाड व शेतकऱ्यांचा सहभाग होता.