फडणवीसांच्या ताफ्यात घुसला मराठा आंदोलक; काळा झेंडा दाखवत 'गो बॅक'ची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 12:50 PM2023-12-30T12:50:52+5:302023-12-30T12:52:54+5:30

आंदोलकास बंदोबस्तावरील महिला पोलिसाने ताब्यात घेतले.

A protester entered Devendra Fadnavis' convoy; Showing the black flag, chanting 'Go Back' | फडणवीसांच्या ताफ्यात घुसला मराठा आंदोलक; काळा झेंडा दाखवत 'गो बॅक'ची घोषणाबाजी

फडणवीसांच्या ताफ्यात घुसला मराठा आंदोलक; काळा झेंडा दाखवत 'गो बॅक'ची घोषणाबाजी

बदनापूर (जालना) : येथील आ.नारायण कुचे यांनी आयोजित केलेल्या श्रीराम कथा व अखंड हरिनाम सप्ताहला आज सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी भेट दिली. हा कार्यक्रम आटोपून जालन्याकडे परत जात असताना एक मराठा आंदोलक उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताफ्यासमोर आला. काळा झेंडा दाखवून 'देवेंद्र फडणवीस, गो बॅक' अशा घोषणा यावेळी या आंदोलकाने दिल्या. त्याला बंदोबस्तावरील महिला पोलिसाने ताब्यात घेतले.

दरम्यान, बदनापुर येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येत्या २२  तारखेला राम मंदिराच उद्घाटन होणार आहे.संपूर्ण भारत पुन्हा एकदा राममय होतोय ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आ. नारायण कुचे यांचे मनापासून अभिनंदन करेल. त्यांनी भव्य रामकथा कार्यक्रम आयोजित केला. राम कथा ज्यांनी ऐकली तोच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये सुधार करू शकतो. जीवनात तरला जाऊ शकतो.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब पाटील दानवे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष अश्विनी पवार,  शहराध्यक्ष सत्यनारायण गेलडा, नगरसेवक पद्माकर जऱ्हाड, गोरखनाथ खैरे, विलास जऱ्हाड, जगन्नाथ बारगजे, अनिल कोलते, भगवान बारगजे, भगवान म्हात्रे आदींची उपस्थिती होती.

Web Title: A protester entered Devendra Fadnavis' convoy; Showing the black flag, chanting 'Go Back'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.