भरधाव कारने घरासमोर बसलेल्या तिघांना उडवत १०० फूट फरफटत नेले; दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 03:27 PM2024-08-22T15:27:08+5:302024-08-22T15:28:26+5:30

या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी आहे

A speeding car blew three people sitting in front of a house; Two died after being dragged 100 feet | भरधाव कारने घरासमोर बसलेल्या तिघांना उडवत १०० फूट फरफटत नेले; दोघांचा मृत्यू

भरधाव कारने घरासमोर बसलेल्या तिघांना उडवत १०० फूट फरफटत नेले; दोघांचा मृत्यू

- फकिरा देशमुख
भोकरदन (जालना) :
भोकरदन- अन्वा रोडवर वाडी शिवारातील गणपती मंदिराजवळ भरधाव कारने घरासमोर बसलेल्या तिघांना चिरडल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.  शंकर सिताराम चोरमारे, वय 35,ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे वय 28 अशी मृतांची नावे आहेत. तर लक्ष्मण चव्हाण हे जखमी झाले आहेत.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी ८ वाजेच्या दरम्यान शंकर सिताराम चोरमारे, ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे आणि लक्ष्मण चव्हाण हे तिघे जण भोकरदन- अन्वा रोडवर वाडी शिवारातील घरासमोर बसले होते. याच दरम्यान अन्वा गावाकडून भोकरदनकडे भरधाव वेगाने आलेल्या कारने ( क्रमांक एम एच ४० सी एक्स १३५० ) घरासमोर बसलेल्या तिघांच्या अंगावर गाडी घातली. गाडीने जवळपास १०० फूट त्यांना फरफटत नेले.

या भीषण अपघातात शंकर चोरमारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी अवस्थेत उपचासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना रस्त्यामध्ये ज्ञानेश्वर शिंदे यांचा मृत्यू झाला. तर तिसरे गंभीर जखमी लक्ष्मण चव्हाण यांच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले. याबाबत भोकरदन पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता.

चालकास डुलकी लागल्याची शक्यता 
सदरील कार एका कंपनीच्या ताफ्यातील असून जायकुमार शरद देशभ्रतार असे चालकाचे नाव आहे. कार जळगाव येथून लातूरकडे दोघांना घेऊन मधल्या मार्गे जात होती. अपघातानंतर चालकाने कार जागेवर उभी केली. सध्या चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. 

Web Title: A speeding car blew three people sitting in front of a house; Two died after being dragged 100 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.