भरधाव ट्रकने ऑटोरिक्षाला उडवले; पाच जणांचा जागीच मृत्यू, मृतात एकाच कुटुंबातील चौघे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 06:46 PM2022-10-17T18:46:31+5:302022-10-17T18:47:18+5:30

माहोरा ते जाफराबाद रोडवर झाला भीषण अपघात

A speeding truck hits autorickshaw; Five people died on the spot, four from the same family | भरधाव ट्रकने ऑटोरिक्षाला उडवले; पाच जणांचा जागीच मृत्यू, मृतात एकाच कुटुंबातील चौघे

भरधाव ट्रकने ऑटोरिक्षाला उडवले; पाच जणांचा जागीच मृत्यू, मृतात एकाच कुटुंबातील चौघे

googlenewsNext

- फकिरा देशमुख
भोकरदन ( जालना):
माहोरा - जाफराबाद रोडवर ट्रक व रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात देऊळगाव राजा येथील पाच जण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी ४ वाजता घडली. मृतांमध्ये एकाच कुटूंबातील चार जणांचा समावेश आहे.

याबाबतची माहिती अशी की, कैफ अशपाक शहा ( 19) हा मित्र मनीष बबन तिरुखे ( 26, राहणार त्रंबकनगर तालुका देउळगाव राजा जिल्हा बुलढाणा )  याला सोबत घेत रिक्षातून ( क्रमांक एम एच 28 बीए 0256 ) माळवंडी ( ता. बुलढाणा )  येथे बहिणीला आणण्यासाठी गेला होता. आज दुपारी ते दोघे बहीण परवीन बी राजू शहा ( 25), आलिया राजू शहा ( 7 ), मुस्कान राजू शहा ( 3 ) यांच्यासह देऊळगाव राजाकडे निघाले.

दरम्यान, माहोरा ते जाफराबाद रोडवर जाफराबादकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने ( एम एच 28 बीबी 2357 ) रिक्षाला उडवले. यात रिक्षातील कैफ अशपाक शहा, परवीन बी राजू शहा, आलिया राजू शहा, मुस्कान राजू शहा या एकाच कुटुंबातील  चार आणि मनीष तिरुखे अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर बाळू खरात ( 23)  व सानिया शहा ( 9 ) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भीषण अपघातानंतर नागरिकांनी धावपळ करून सर्वांना बाहेर काढत जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच जाफराबादचे सपोनि राजाराम तडवी, भोकरदनचे सपोनि रत्नदीप जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक मदन, गणेश पायघन यांच्यासह कर्मचारी अपघात स्थळी दाखल झाले. 

Web Title: A speeding truck hits autorickshaw; Five people died on the spot, four from the same family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.