फरार संशयित गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:57 AM2018-04-20T00:57:34+5:302018-04-20T00:57:34+5:30
घरफोडी प्रकरणातील दोन फरार संशयितांना विशेष कृती दलाच्या पथकाने गुरुवारी घनसावंगी तालुक्यातील हातडी येथून ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घरफोडी प्रकरणातील दोन फरार संशयितांना विशेष कृती दलाच्या पथकाने गुरुवारी घनसावंगी तालुक्यातील हातडी येथून ताब्यात घेतले.
चोरी व घरफोडी प्रकरणात सहभागी असलेले पोलीस रेकार्डवरील दोन संशयित हातडी येथे असल्याची माहिती विशेष कृती दलाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने हातडी येथे जाऊन संशयित माणिक जर्मल्या काळे व दुबळ्या बुट्ट्या काळे यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले. दोघेही आष्टी व घनसावंगी पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार होते. संशयितांवर मंदिरात चोरी करणे, घरफोडी, शेतातील विद्युतमोटार चोरणे आदी गुन्हे दाखल आहेत. मंठा फाट्यावरील गणेश अॅटोमोबाईल्स हे दुकान फोडल्याची कबुलीही त्यांनी चौकशीत दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून दुकानातून चोरलेले साडेतीन हजार रुपये जप्त केले. माणिक काळे यास आष्टी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, कर्मचारी एम. बी. स्कॉट, रामप्रसाद रंगे, फुलचंद हजारे, संदीप चिंचोले, राजू पवार यांनी ही कारवाई केली.