वैद्यकीय अधिकारी गैरहजर: आरोग्य केंद्राला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:32 AM2021-04-23T04:32:46+5:302021-04-23T04:32:46+5:30
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी रुग्ण आले असता तिथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची ...
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी रुग्ण आले असता तिथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची हेळसांड झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णांनी गुरूवारी प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकले.
वडीगोद्री येथील आरोग्य केंद्रात २ वैद्यकीय अधिकारी आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून डॉ. सुशील जावळे हे कोरोनाबाधित असून, ते अजून रुजू झाले नाही. तसेच डॉ. मीरा सावंत यांच्या आई आजारी असल्याने त्या देखील रजेवर आहेत. त्यामुळे दोन्ही वैद्यकीय अधिकारी नसल्याने आलेल्या रूग्णांना अंबड येथे जावे लागत आहे. संतप्त नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. नागरिकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला असता, त्यांनी तातडीने जामखेड येथील वैद्यकीय डॉ. ए. एस. देशमुख यांना पाठविले. त्यानंतर कुलूप उघडण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सभापती बापूराव खटके, मनसे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब बोंबले, अभिजित खटके, विष्णू खटके, गणेश नाझरकर, अशोक सोलनकर, अशोक बनकर यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.