पारध परिसरात गहू काढणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:34 AM2021-03-01T04:34:46+5:302021-03-01T04:34:46+5:30
खरीप हंगामात यंदा जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होेते. पिकांचे नुकसान ...
खरीप हंगामात यंदा जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होेते. पिकांचे नुकसान झाले असले, तरी विहिरी व बोअरवेलला मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांतून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. त्यातच पिकेही चांगली आहेत. आता गहू, हरभरा व ज्वारीचे पीक काढणीला आले आहे, परंतु मागील आठवड्यात भोकरदन तालुक्यात गारपीट झाली. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची पिके काढण्यासाठी धडपड सुरू आहे. पारध परिसरातील शेतकरी हार्वेस्टरच्या साहाय्याने गहू काढत आहे. हार्वेस्टरने गहू काढणीचा दर एकरी दोन हजार असला, तरी पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी गहू काढला जात आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप गेलं, आता गारपिटीमुळे रब्बी हातातून जाऊ नये, म्हणून शेतकरी गहू काढणीला लागले आहेत. हार्वेस्टर चालकांकडून एकरी दोन हजार रुपये घेतले जात आहे. गहू काढून धान्य घरात आणण्याची धडपड सुरू आहे.
संजय लोखंडे, शेतकरी
===Photopath===
280221\28jan_18_28022021_15.jpg
===Caption===
पारध येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील गहू हार्वेस्टरद्वारे काढण्यात येत आहे.