‘१३ तारखेच्या आत मागण्या मान्य करा’; ३ आमदारांच्या शिष्टमंडळाची जरांगे यांच्याशी तासभर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 06:30 AM2024-08-04T06:30:15+5:302024-08-04T06:31:31+5:30
जरांगे यांचा ७ ऑगस्टपासून दौरा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी बार्शीचे राजेंद्र राऊत, बदनापूरचे नारायण कुचे, तुळजापूरचे राणाजगजितसिंह पाटील या तीन आमदारांच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन एक तास चर्चा केली.
वडीगोद्री (जि. जालना) : १३ ऑगस्टपर्यंत शासनाने मागण्या मान्य कराव्यात. आम्ही राजकारणात जाणार नाहीत; परंतु मागण्यांवर योग्य विचार न झाल्यास समाजाच्या म्हणण्यानुसार आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
जरांगे यांचा ७ ऑगस्टपासून दौरा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी बार्शीचे राजेंद्र राऊत, बदनापूरचे नारायण कुचे, तुळजापूरचे राणाजगजितसिंह पाटील या तीन आमदारांच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन एक तास चर्चा केली. या चर्चेनंतर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभा काय असते हे निवडणुकीत कळेल. १३ ऑगस्टपर्यंत वेळ दिला आहे. त्यामुळे त्यांनी वेळेत मागण्या मान्य कराव्यात. त्यातही आमची बैठक २९ ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे २९ तारखेपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणे आमचे काम आहे. त्यानंतर मात्र समाज सांगेल तो निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.