ओव्हरटेक करताना अंदाज चुकला अन् पिकअप महामार्गावर उलटला; २० जण जखमी, तिघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 05:48 PM2022-03-12T17:48:27+5:302022-03-12T17:48:49+5:30
वडीगोद्रीजवळ पिकअप उलटल्याने त्यातील २० जण जखमी झाले आहेत.
वडीगोद्री ( जालना ) : जालना-वडीगोद्री राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीजवळ पिकअपचा अपघात होऊन २० जण जखमी झाले आहेत. तर ३ जणांची प्रकृति चिंताजनक आहे. १० जणांवर जालना येथे उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
अंबड तालुक्यातील पिठोरी शिरसगाव येथील सय्यद कुंटुबातील एका मुलीचा दि.११ मार्च रोजी विवाह सोहळा पार पडल्याने आज दि १२ मार्च रोजी ओलिमासाठी लहान मुलासह महिला व पुरुष तिंतरवणी ( जिल्हा बीड ) येथे पिकअप ( एम.एच.२१ एक्स ८१७८ ) या वाहनातून जात होते. वडीगोद्रीजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना चालकाला समोरील वाहनांचा अंदाज न आल्याने पिकअप रस्त्यावर उलटला. यात २० जण जखमी झाले आहेत. तर ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.
सदरील घटना घडल्याचे कळताच वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सुशिल जावळे यांनी जखमींना ताबडतोब उपचार मिळण्यासाठी रुग्णांना १०२ व १०३ रुग्णवाहिकेने अंबड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यासाठी तसेच धाकलगावचे उमेश माळवदे, साळीकराम बाळसराफ व सतीश ढोणे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना ग्रामस्थांनी मदत करत उपचारासाठी अंबड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तेथून जालना येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात अरबाज रहमोद्दीन शेख ,(वय १५) दाढेगाव,मोसिन नबी सय्यद ,(वय १२) पि.सिरसगाव,हुसेन हबीब सय्यद,(वय ४३ ) पि.सिरसगाव,तनविर हुसेन सय्यद ( वय १६ ),पि.सिरसगाव,गफर तान्हु शेख,( वय ,६२ ) दाढेगाव,हबीब सय्यद,(वय ६५ ) पि.सिरसगाव,रिहान हुसैन सय्यद (वय ५८ ),अदील शेख,गेवराई,( १० वर्षे )इरफान शेख, ( ११ वर्षे ) औरंगाबाद,सोहेल शेख(१२ वर्षे) या सर्वाना जालना येथे उपचार सुरू असून यापैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
रहीमोद्दीन गफर शेख( ३७ वर्षे),दाढेगाव,फरजाना रहीमोद्दीन शेख ,( ३४ वर्षे ) दाढेगाव,सना रहीमोद्दीन शेख( १४ वर्षे) दाढेगाव,अल्फीया नबी सय्यद( १२ वर्षे) पि.सिरसगाव,कुलसुम गफूर शेख, दाढेगाव, ( ५५ वर्षे) अलिशान रसिद सय्यद, (५१ वर्षे) मातोरी जि.बिड, मेहमुदा हबीब शेख( ५२ वर्षे),पि. सिरसगाव,सिमरन शफीक शेख( २५ वर्षे) जातेगाव जि.बिड,रिजवाना महेबुब सय्यद रामगव्हाण (३० वर्षे )जि.बिड.सिम्रन रफिक शेख (२३ वर्षे) जातेगाव यांच्यावर अंबड येथे उपचार सुरु आहे.