कीटकनाशक घेऊन परणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू; कारने २०० फुट नेले फरफटत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 06:04 PM2022-09-06T18:04:21+5:302022-09-06T18:04:59+5:30

सिल्लोड येथून कीटकनाशक घेऊन येताना झाला अपघात

Accidental death of farmer carrying pesticide; The car trashed him 200 feet | कीटकनाशक घेऊन परणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू; कारने २०० फुट नेले फरफटत

कीटकनाशक घेऊन परणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू; कारने २०० फुट नेले फरफटत

Next

भोकरदन (जालना) : भोकरदन-सिल्लोड रोडवर मुठाड पाटीजवळ कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी १ वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात कारमधील दोघे जखमी झाले आहेत. 

या बाबतची माहिती अशी की, चरणसिंग अजबसिंग भेंडवाल (३२, रा. रामेश्वर वाडी, इब्राहिमपूर) हा शेती करतो. आज दुपारी कीटकनाशक खरेदीसाठी तो दुचाकीवर (एम एच 21 बी यु 7074 ) सिल्लोडला गेला होता.   दुपारी १ वाजेच्या दरम्यान भोकरदनकडे परत येताना सिल्लोडकडे जाणाऱ्या भरधाव कारने ( एमएच 04 बीएन 250 ) चरणसिंगच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. कारने दुचाकीसह चरणसिंगला 100 ते 200 फूट फरफटत नेले . यात चरणसिंग याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील इकबाल कुरेशी ( 65) , बिलकीस कुरेशी ( 60, रा भोकरदन ) हे दोघे जखमी झाले. जखमींना अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल करण्यात आल्याची माहिती सपोनि रत्नदीप जोगदंड यांनी दिली आहे.

Web Title: Accidental death of farmer carrying pesticide; The car trashed him 200 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.