लुटमारीतील आरोपी १७ वर्षांनंतर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:29 AM2019-07-15T00:29:52+5:302019-07-15T00:30:13+5:30
लुटमार प्रकरणात १७ वर्षे फरार असलेल्या बल्लू ऊर्फ बलराम शिवलाल कासारे याला एडीएसच्या पथकाने जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लुटमार प्रकरणात १७ वर्षे फरार असलेल्या बल्लू ऊर्फ बलराम शिवलाल कासारे याला एडीएसच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई रविवारी पहाटे जालना शहरात करण्यात आली.
शहरातील जुन्या एमआयडीसी भागात २००२ मध्ये एकास मारहाण करून दुचाकी व १० हजार रूपये लंपास करण्यात आले होते. पोलिसांनी सुनिल खोतकर (रा.पडेगाव जि.औरंगाबाद) याला जेरबंद केले होते. खोतकर याने हा गुन्हा बल्लू कासारे याच्या सोबत केल्याची कबुली दिली होती. मात्र, तेव्हापासून कासारे हा फरार होता. १७ वर्षे फरार असलेला बल्लू हा मुंबई येथून जालना येथील घरी आल्याची माहिती एडीएसच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख पोनि यशवंत जाधव, हवालदार ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण यांनी रविवारी पहाटेच्या सुमारास शहरातील लालबाग भागात कारवाई करून कासारे याला ताब्यात घेतले. त्याला सदरबाजार ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.