फिर्यादीच निघाला आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:43 AM2018-10-14T00:43:58+5:302018-10-14T00:44:36+5:30
शहरातील एका २१ वर्षीय युवकांने चोरी झाल्याचा बनाव करून १ लाख रुपये हडप केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, चंदनझिरा पोलिसांनी २४ तासांत या गुन्ह्याचा तपास लावला आहे. करण किसन खैरे (२१. रा. मस्तगड जालना) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील एका २१ वर्षीय युवकांने चोरी झाल्याचा बनाव करून १ लाख रुपये हडप केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, चंदनझिरा पोलिसांनी २४ तासांत या गुन्ह्याचा तपास लावला आहे. करण किसन खैरे (२१. रा. मस्तगड जालना) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
करणने शुक्रवारी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, विजय स्क्रॅप कंपनीमध्ये ६ महिन्यापासून आॅफिसबॉय म्हणून काम करतो. शुक्रवारी (दि. १२ आॅक्टोबर) सायंकाळी या कंपनीचे मालक अनुप अग्रवाल यांनी मित्राकडून १ लाख रुपये घेवून ते राजेश काळे यांना देण्याचे सांगितले. सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास एमआयडीसी भागातून पैसे घेवून जात असतांना फ्लोरॉईन हॉटेलजवळ तीन जणांनी माझी गाडी अडवून मला बेदम मारहाण करुन माझ्याकडून १ लाख रुपये काढून घेतले अशी तक्रार दिली.
पोलिसांनी घराची झाडाझडती घेतल्यानंतर पुन्हा पोलिसी खाक्या दाखविल्यावर फिर्यादीने गुन्ह्याची कबूली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
२४ तासात लावला छडा
शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता करणने तक्रार नोंदविली होती. त्याच्या तक्रारीवरून पोलीसांनी रात्रीच चोरट्यांचा शोध सुरु केला. संशयितांच्या घरी जावून शोधले. परंतु, पोलीसांच्या हाती काहीच लागले नाही. करणला विचारपुस केली असता, तो गोंधळात अडकला. व त्याने रात्री अडीच वाजता गुन्ह्यांची कबूली दिली.
का केली चोरी ?
करण हा गरीब कुटुंबातील असून, त्याच्यावर ७० हजार रुपयांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने हा बनाव केला, अशी माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली.