आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी उत्पन्न वाढीचे स्त्रोत सांगावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:51 AM2019-09-11T00:51:40+5:302019-09-11T00:51:59+5:30
नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी मंगळवारी सत्ताधा-यांनी जे आरोप केला, तसेच पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी नेमके काय केले पाहिजे, हा प्रस्ताव आरोप करणा-यांनी द्यावा, असे आवाहनही गोरंट्याल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आज कर आकारणीच्या मुद्यासह अन्य मुद्यावरून सत्ताधारी मंडळी राजकारणकरत आहेत. कुठलाही मुद्दा हा पालिके भोवती फिरत ठेवून पालिका प्रशासनाला बदनाम करण्याचे षडयंत्रच रचले जात आहे. परंतु ये पब्लिक है.. सब जानती है..असे म्हणून नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी मंगळवारी सत्ताधा-यांनी जे आरोप केला, तसेच पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी नेमके काय केले पाहिजे, हा प्रस्ताव आरोप करणा-यांनी द्यावा, असे आवाहनही गोरंट्याल यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय वातावरण तापत ठेवण्याचे काम सत्ताधारी मंडळीकडून केले जात आहे. जालना शहरातील पालिका ही सत्ताधाºयांच्या नाकावर टिच्चून जनतेने काँग्रेसच्या हाती दिली आहे.
हेच मुळात या सत्ताधा-यांचे दु:ख आहे. त्यामुळे स्वत:ची लोकप्रियता वाढीसाठी आमच्यावर आरोप करून स्वत:चे समाधान करून घेतले जात आहे.
जालना पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी ज्यावेळी एजन्सी नेमण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय आम्ही प्रथम सर्वसाधारण सभेत ठेवला होता. सभागृहाची मान्यता घेऊन आम्ही हे काम दिले आहे.
या एजन्सीकडून सर्व्हे करताना काही चुका झाल्याही असतील. परंतु, हे सर्वेक्षणच चुकीचे आहे. असे म्हणजे योग्य ठरत नाही.
पालिकेला मालमत्ता कर आणि नळपट्टी आकारणीतूनच हक्काचे उत्पन्न मिळते.
आम्ही कर आकारणी केल्यावर ज्यांना होते, त्यांना आक्षेप दाखल करण्यासाठीची वेळ दिली होती. तसेच आक्षेप दाखल केल्यांकडून केवळ ३० टक्केच कर वसूल केला जात आहे.
अद्यापही यावर अंतिम निर्णय झाला नाही. ज्यांनी आक्षेप घेतले नाहीत, त्यांच्याकडून कर वसुली केली जात असल्याचेही गोरंट्याल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.