आचार्य भानुकवी साहित्य संमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:32 AM2018-01-02T00:32:12+5:302018-01-02T00:32:41+5:30

अभिजात मराठी भाषा परिषद, आचार्य भानुकवीश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे आयोजित पहिले राज्यस्तरीय आचार्य भानुकवी मराठी साहित्य अंबडमधील पंडित जळगावकर नाट्यगृहात रविवारी उत्साहात पार पडले.

Acharya Bhanukavi literature meet | आचार्य भानुकवी साहित्य संमेलन उत्साहात

आचार्य भानुकवी साहित्य संमेलन उत्साहात

googlenewsNext

अंबड : अभिजात मराठी भाषा परिषद, आचार्य भानुकवीश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे आयोजित पहिले राज्यस्तरीय आचार्य भानुकवी मराठी साहित्य अंबडमधील पंडित जळगावकर नाट्यगृहात रविवारी उत्साहात पार पडले.
साहित्य संमेलनाचे उदघाटन आ. नारायण कुचे यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी प्रा.शिवाजी हुसे होते. या वेळी डॉ. अशोक देशमाने, डॉ. सुशीला सोलापुरे, डॉ. संजीवनी तडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी श्रीपंचकृष्ण ज्ञानाश्रम ठाकूरनगर अंबड येथून ग्रंथदिंडीचा प्रारंभ झाला. प्राचार्य डॉ. भागवतराव कटारे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उदघाटन झाले. यावेळी राज्यस्तरीय आचार्य भानुकवी वाङ्मय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी डॉ. अशोक देशमाने म्हणाले, की मराठीचा मूळ पाया महानुभाव आहे. मराठी विद्यापीठ चक्रधर स्वामींच्या नावे झाल्यास ती गौरवाची बाब ठरेल. आचार्य शेवलीकर बाबा यांनी मराठीच्या संदर्भात काम करताना महानुभावांचे आद्यत्व का स्वीकारत नाही, असा साहित्यिकांना आणि शासनाला खडा सवाल केला. साहित्य आणि साहित्य संमेलन हे कुणाही एकाची मक्तेदारी नसून साहित्य हे समाजाला दिशा देण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले.
परिसंवादात 'महानुभाव साहित्यिकांचे मराठी साहित्याला योगदान या विषयावर बोलताना अध्यक्ष डॉ. बळवंत भोयर यांनी मराठी भाषेचे जनक चक्रधर स्वामीच आहेत असे मत मांडले. सहभागामध्ये डॉ. राम रौनेकर यांनी साहित्य हे एककेंद्री नसून सर्व घटकांचा समावेश त्यात असावा, असे मत व्यक्त केले. डॉ. सर्जेराव जिगे यांनी महाराष्ट्रातील बोली भाषेला मराठी बनवण्याचे काम महानुभाव संप्रदायाने केले, असे मत व्यक्त केले. डॉ मारोती घुगे यांनी भास्करभट्ट बोरीकरपासून ते भानुकवी यांच्या पर्यंतचे साहित्यिक हा मायबोलीचा अभिमान असल्याची भूमिका मांडली. तर प्रा. राजकुमार शेंडे यांनी साडेसहा हजार ग्रंथसंपदा महानुभाव संप्रदायाने मराठीला दिल्याचे सांगितले.
संमेलनासाठी महंत दिवाकर बाबा जामोदेकर, लीलाबाई जामोदेकर, महिमा जामोदेकर, अंकुश चव्हाण, गिरीधर राजपूत, प्रा.दीपक राखूनडे, प्रा.मारोती घुगे, अशोक डोरले, प्रा.उबाळ, प्रा.सुलभा मुरलीधर, प्रा.विद्या दिवटे, प्रा.भारत भूषणशास्त्री, लक्ष्मण गोडसे, राहुल कासोदे, ज्ञानेश्वरी लाड, प्रीती होंडे, मनीषा होंडे, सपना पाटेकर, श्रुती लहाने, अनिशा होंडे, प्रियांका चिंतामणी, प्रतीक्षा मुंजाळ, मनीषा सानप, नंदिनी काळवणे, शिवराज गायकवाड, दिग्विजय उबाळे, अनिरुद्ध मिसाळ, विलास मोरे आदींनी परिश्रम घेतले.
--------------
एकपात्री प्रयोगही रंगला
दुपारी दोन ते दीड या कालावधीत 'मी महदंबा बोलतेय हा एकपात्री प्रयोग वनिताताई गायकवाड यांनी सादर केला. चक्रधर स्वामींनी त्या काळात स्त्रियांना दिलेल्या अधिकारामुळेच आज आम्ही कणखर महदंबा बनल्या असल्याचे सांगितले. जागर जाणिवांचा हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम डॉ. विनोद जाधव आणि संचाने सादर करीत संमेलनाला बहारदार रंगत आणली. ज्ञानेश्वरी लाड यांनी लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

Web Title: Acharya Bhanukavi literature meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.