शिवसेना, राष्ट्रवादीसाठी मित्रपक्षांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:43 AM2019-04-15T00:43:49+5:302019-04-15T00:44:27+5:30

लोकसभा निवडणुकीतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या प्रमुख उमेदवारांना लीड देण्यासाठी मित्रपक्ष भाजपा व काँग्रेसची प्रतिष्ठा परतूर विधानसभा मतदारसंघात पणाला लागली आहे

To achieve the respect of the ally for Shivsena, NCP | शिवसेना, राष्ट्रवादीसाठी मित्रपक्षांची प्रतिष्ठा पणाला

शिवसेना, राष्ट्रवादीसाठी मित्रपक्षांची प्रतिष्ठा पणाला

Next

शेषराव वायाळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : लोकसभा निवडणुकीतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या प्रमुख उमेदवारांना लीड देण्यासाठी मित्रपक्ष भाजपा व काँग्रेसची प्रतिष्ठा परतूर विधानसभा मतदारसंघात पणाला लागली आहे. यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रचारात रान उठविले आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला लीड देणारा विधानसभा मतदारसंघ म्हणून परतूरची ओळख आहे. या मतदारसंघात खरी लढत भाजपा आणि काँग्रेसमध्येच सुरु असते. मंठा नगरपंचायत शिवसेनेच्या तर परतूर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे परभणी जिल्ह्याचे संपर्कमंत्री असून तेच परतूरचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने मित्र पक्षाला या निवडणुकीत लीड मिळवून देण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. नगरपालिका निवडणुकीत बसलेल्या धक्क्यातून ते सावरले असून त्याची प्रचिती मताधिक्यातून त्यांना या निवडणुकीतून द्यावी लागणार आहे. तर काँग्रेसचे माजी आ.सुरेश जेथलिया यांनी नगरपालिका निवडणुकीत मिळविलेला विजय योगायोग नसून आजही आपली परतूरवर पकड कायम आहे, हे सिद्ध करण्याची जेथलिया यांना या माध्यमातून संधी आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्यासाठी बबनराव लोणीकर, राहुल लोणीकर तसेच सेनेचे ए.जे. बोराडे, माधवराव कदम, मोहन अग्रवाल, बाबासाहेब तेलगड, अशोक जाधव हे प्रचार यंत्रणा राबवित आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यासाठी काँग्रेसचे माजी आ.सुरेश जेथलिया, अनवर देशमुख, राजेश राठोड, राष्ट्रवादीचे कपील आकात, पंकज बोराडे, बळीराम कडपे, रमेश सोळंके यंत्रणा राबवित आहेत. तर दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही स्वपक्षाच्या उमेदवारास लीड देण्यासाठी झटत आहेत. वंचित आघाडीचे आलमगीर खान यांच्यासाठीही त्यांचे कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहेत.
प्रचारात विकासाच्या मुद्यावर चर्चा होण्याऐवजी पाटील-देशमुख हाच मुद्दा उपस्थित केला जात आहे.

मागच्या निवडणुकीत़़़
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे बबनराव लोणीकर यांना ४६ हजार ९३७ तर काँग्रेसचे सुरेश जेथलिया ४२ हजार ५७७ मते मिळाली होती. लोणीकर यांनी जेथलिया यांचा ४ हजार ३६० मतांनी पराभव केला होता.

Web Title: To achieve the respect of the ally for Shivsena, NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.