आगीत संसारोपयोगी साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 01:13 AM2020-02-01T01:13:35+5:302020-02-01T01:14:11+5:30
भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील एका घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील एका घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून, यात संबंधितांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
वालसावंगी येथील गंगाराम शेनफड सावळे यांच्या घराला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच शेजारील नागरिकांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत या आगीत घरातील टीव्ही संच, पंखे, पाण्याची टाकी, कपडे, दाळी, गहू, ज्वारीसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने घरात कुणी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. घटनेचा प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला असून, यात संबंधितांचे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. आग कोणत्या कारणाने लागली, हे मात्र, समजू शकले नाही.