जालना जिल्ह्यात वर्षभरात २९ लाचखोरांवर कारवाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 12:26 PM2020-11-14T12:26:57+5:302020-11-14T12:28:02+5:30

चालू वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण २४ सापळे रचून कारवाया केल्या आहेत.

Action against 29 bribe takers in Jalna district during the year | जालना जिल्ह्यात वर्षभरात २९ लाचखोरांवर कारवाई  

जालना जिल्ह्यात वर्षभरात २९ लाचखोरांवर कारवाई  

Next
ठळक मुद्देमहसूल, पोलीस   दलावर चार सापळे

जालना : शहरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालू वर्षात २४ सापळे रचून २९ लाचखोरांवर कारवाई केली आहे. या कारवाईत महसूल आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी अधिक संख्येने पकडण्यात आले आहेत.

सर्वसामान्य नागरिकांची कामे करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी सर्रासपणे लाच मागतात. ज्यांना ही लाच देणे शक्य होत नाही. लाच देऊ वाटत नाही, अशा नागरिकांकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी केल्या जातात. येणाऱ्या तक्रारींची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कारवाईही केली जाते. चालू वर्षात येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २४ सापळे रचून कारवाया केल्या आहेत. यात महसूलमधील सात, पोलीस दलातील पाच, पंचायत समितीतील दोन, जिल्हा परिषदेतील दोन, कृषी विभागातील तीन, महावितरणमधील एक, नगर परिषदेतील तीन, खादी व ग्रामोद्योगमधील एक, शिक्षण संस्था, सरपंच व खाजगी व्यक्ती अशा पाच जणांवर या कारवाया करण्यात आल्या आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी  पैशांची मागणी करीत असेल तर नागरिकांनी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महसूल, पोलीस   दलावर चार सापळे
चालू वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण २४ सापळे रचून कारवाया केल्या आहेत. यात महसूल व पोलीस दलातील लाच प्रकरणात प्रत्येकी चार, जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रत्येकी दोन, कृषी विभाग तीन, महावितरण एक, नगर परिषद दोन, खादी व ग्रामोद्योग एक, इतर विभागाविरुद्ध पाच सापळे यशस्वी करण्यात आले आहेत.

Web Title: Action against 29 bribe takers in Jalna district during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.