मोक्काअंतर्गत ७ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:52 AM2020-01-08T00:52:35+5:302020-01-08T00:53:05+5:30

शेलगाव येथील संजय अंभोरे खूनप्रकरणातील ७ आरोपींविरुद्ध मोक्का कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली.

Action against 3 persons under Mokka | मोक्काअंतर्गत ७ जणांवर कारवाई

मोक्काअंतर्गत ७ जणांवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेलगाव येथील संजय अंभोरे खूनप्रकरणातील ७ आरोपींविरुद्ध मोक्का कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली.
राजसिंग ऊर्फ कुलदीपसिंग शामसिंग कलाणी (रा. टीव्ही. सेंटर म्हाडा कॉलनी, जालना), उत्तम महाजन घुनावत, मदन गोपाल खोलवाल, सुमेरसिंग रामचंद्र काकरवाल ( तिघे रा. राजेवाडी ता. बदनापूर), सुनील प्रेमदास वनारसे (रा. सहकार कॉलनी नूतन वसाहत जालना), चंद्रकांत ऊर्फ दादू सुनील आठवले (रा. कालीकुर्ती बडी सडक, जालना), गौतम मधुकर सोनवणे (रा. सेलगाव, ता. बदनापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे ७ आॅक्टोंबर रोजी ठेकेदारीच्या कारणावरून संजय किसनराव अंभोरे यांचा खून करण्यात आला होता.
या आरोपींवर २०१२ पासून जालना शहर व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांचे अभिलेखे हस्तगत केले. सदर गुन्ह्यांच्या अभिलेखांची छाननी केली असता, आरोपीविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, कट कारस्थान रचून दंगल करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे, फसवणूक करणे, दुखापत करणे, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे, शस्त्रविक्री करणे इ. गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. दुर्गेश राजपूत, पोहेकॉ. हरीश राठोड, पोकॉ. किरण मोरे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Action against 3 persons under Mokka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.