विनामास्क फिरणाऱ्या ७२ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:34 AM2021-03-01T04:34:41+5:302021-03-01T04:34:41+5:30
जिल्ह्यासह राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासनाने खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे ...
जिल्ह्यासह राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासनाने खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असताना काही लोक रस्त्यावर विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. बदनापूर शहरात विनामास्क फिरणाऱ्या तब्बल ७२ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई नायब तहसीलदार संतोष शिंदे, तलाठी होळकर, नगर पंचायतचे लिपिक हिंमत दाभाडे, मिलिंद दाभाडे, लक्ष्मण पवार, रशीद पठाण, विजय पाखरे, पोहेकॉ. बाबासाहेब खंडागळे, कांबळे आदींनी केली.
कोट
मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, तरीही नागरिक नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. नागरिकांनी नियमांचे पालन करावे.
डॉ. पल्लवी अंभोरे, मुख्याधिकारी, नगरपंचायत
===Photopath===
280221\28jan_14_28022021_15.jpg
===Caption===
बदनापूर येथे कारवाई करताना पदाधिकारी दिसत आहे.