रिक्षाचालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:33 AM2021-09-22T04:33:53+5:302021-09-22T04:33:53+5:30
जालना : सूचनांचे उल्लंघन करून रिक्षा चालविणाऱ्या ३३ चालकांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. शहर वाहतूक शाखा व परिवहन ...
जालना : सूचनांचे उल्लंघन करून रिक्षा चालविणाऱ्या ३३ चालकांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. शहर वाहतूक शाखा व परिवहन विभागाच्यावतीने मंगळवारी अचानक राबविलेल्या या कारवाईमुळे रिक्षाचालकांमध्ये खळबळ उडाली होती. या कारवाईत दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरातील रिक्षाचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून रिक्षा चालवित आहेत. ही बाब पाहता, शहर वाहतूक शाखा व परिवहन विभागाने मंगळवारी अचानक कारवाईची मोहीम हाती घेतली. शहरातील विशाल कॉर्नरपासून भोकरदन नाका, बस स्थानक, मामा चौक, सावरकर चौक, कडबी मंडी, मंमादेवी या भागात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये जवळपास दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक नितीन पाटील, उदय साळुंखे, शरद तरटे, राजकुमार मुंडे, अच्युत भातलोंढे, सुनील गीते, अमोल राठोड, अभिजित रिळे, कृष्णा मोहकरे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मजहर सय्यद, पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत, पोलीस अंमलदार नंदकिशोर टेकाळे, हवालदार राजेंद्र ठाकूर, भगवान बनसोडे, नंदकिशोर कामे, भगवान नागरे आदींच्या पथकाने केली.
फोटो