बेशिस्त वाहनधारकांविरुध्द कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:10 AM2019-05-01T01:10:14+5:302019-05-01T01:10:38+5:30
वाहतुुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांविरुध्द वाहतूक पोलिसांनी मंगळवारी दंडात्मक कारवाई करुन नियम मोडणा-याकडू दंड वसूल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वाहतुुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांविरुध्द वाहतूक पोलिसांनी मंगळवारी दंडात्मक कारवाई करुन नियम मोडणा-याकडू दंड वसूल केला. वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने अनेक रिक्षाचालकांची धांदल उडाली होती.
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, पोलीस हवालदार सिमोन कसबे, बी.डी. वराडे, पोलीस कॉस्टेबल विनोद सरदार, दत्ता जाधव, महिला पोलीस शिपाई नम्रता कांबळे, आरती रणदिवे यांनी मामा चौकात बेशिस्त रिक्षाचालकांना गणवेश परिधान न करणे, चालकाशेजारी प्रवाशांना बसविणे, मोटारसायकलवर ट्रिपल सीट जाणे, फोनवर बोलणे इ. कारणांमुळे ही कारवाई करून दहा हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरातील अनेक भागांमध्ये एकेरी वाहतूक व्यवस्था केली आहे. परंतु त्या भागातील अस्वच्छतेमुळे ती कोलमडली आहे.