टेंभुर्णीत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:34 AM2021-03-01T04:34:56+5:302021-03-01T04:34:56+5:30
टेंभुर्णी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही गावात बिनधास्त विनामास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात टेंभुर्णी ग्रामपंचायत व पोलिसांनी मिळून संयुक्त कारवाई केल्याने ...
टेंभुर्णी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही गावात बिनधास्त विनामास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात टेंभुर्णी ग्रामपंचायत व पोलिसांनी मिळून संयुक्त कारवाई केल्याने जनतेत एकच खळबळ उडाली आहे.
वेळोवेळी सूचना देऊनही गावात अनेकजण विनामास्क हिंडत असल्याचे स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पोलिसांची मदत घेऊन शुक्रवारपासून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. यात विनामास्क फिरणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. शिवाय पोलिसांचा प्रसादही मोफत दिला जात आहे. यामुळे नागरिकांत एकच खळबळ उडाली असून, गावात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या घटली आहे. या कारवाईत ग्रामविकास आधिकारी एस. डी. शेळके, पोलीस कर्मचारी पंडित गवळी, मंगेश शिंदे, त्र्यंबक सातपुते यांच्यासह गौतम म्हस्के, सुनील भाले, विक्रम उकांडे, बाबासाहेब जमधडे, डिगांबर भिसे, रामदास धनवई, सुभाष घोडे, बाबू साबळे, आदींनी सहभाग घेतला.
===Photopath===
280221\28jan_27_28022021_15.jpg
===Caption===
विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करताना टेंभुर्णी येथील ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस कर्मचारी.