बेकायदेशीररीत्या दारूची विक्री करणाऱ्या १५ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:27 AM2021-04-14T04:27:33+5:302021-04-14T04:27:33+5:30
३ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई जालना : बेकायदेशीरीत्या दारूची विक्री करणाऱ्या ...
३ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
जालना : बेकायदेशीरीत्या दारूची विक्री करणाऱ्या १५ जणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. ही कारवाई १ ते १२ एप्रिलदरम्यान करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी किरण मारोती उप्पलवाड (चंदनझिरा), अर्जुन भीमराव एखनार (धाणेवाडी), रज्जाक शेख उस्मान (दगडवाडी), सुधाकर मच्छिंद्र कातुरे (दगडवाडी), कैलास प्रभू राठोेड (वसंतनगर), चेतन सुरेश जैस्वाल (खांबखेडा, ता. भोकरदन) भागवत प्रभू मुळे (रा. बाभूळगाव, भोकरदन), योगेश ज्ञानेश्वर कुबेर (ता. जालना), विजय कचरू कंकाळ (जालना), शुभम अशोक ओताडे (चंदनझिरा), दत्तू तुकाराम घोडके (भोकरदन), संतोष भगवान लोखंडे (बरंजळा, ता. भोकरदन) यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय उपायुक्त पी. एच. पवार यांच्या सूचनेनुसार अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या पथकाने १ ते १२ एप्रिलदरम्यान जालना शहरासह भोकरदन तालुक्यातील हॉटेल, ढाब्यांवर छापा मारला. पथकाने वेगवेगळ्या १५ ठिकाणांहून देशी दारूच्या १०३४, विदेशी ४४८, बीअर ८४ व गावठी हातभट्टी दारूच्या १४० बाटल्या जप्त करण्यात आल्या. ज्याची किंमत ३ लाख ३१ हजार ५५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही निरीक्षक एस.ए. शिंदे, सु. अ. गायकवाड, आर. एन. रोकडे, दुय्यम निरीक्षक ए.टी. बिडकर, ए.ए. ओटे, सु. अ. चव्हाण, बी. एम. सूर्यवंशी, बी. एस. पडूळ, एस. जी. कांबळे, डी.एच. सांबारे, एस. टी. डहाळ आदींनी केली आहे.