अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:32 AM2021-09-25T04:32:15+5:302021-09-25T04:32:15+5:30
जालना : अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर वन विभागाच्या पथकाने कारवाई केली. ही कारवाई गुरुवारी रात्री जालना ते ...
जालना : अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर वन विभागाच्या पथकाने कारवाई केली. ही कारवाई गुरुवारी रात्री जालना ते मंठा मार्गावरील चौधरीनगर जवळ करण्यात आली.
एका ट्रकमधून अवैधरित्या लाकडांची वाहतूक होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीवरून औरंगाबादेतील उपवनसंरक्षक सु. वि. मंकावर, सहायक वन संरक्षक पी. पी. पवार यांच्या आदेशावरून गस्तीवरील पथकाने गुरुवारी रात्री जालना ते मंठा रोडवर चौधरी नगरजवळ अवैध लाकडांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर (क्र. एम. एच. ४३- ९०७५) कारवाई केली. संबंधित ट्रक चालकाकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे, परवाना आढळून आला नाही. संबंधित लाकडे मालेगावकडे नेली जात होती. पथकाने ट्रक ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय परिसरात जमा केला. याप्रकरणी वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक सु. वि. मंकावर, सहायक वनसंरक्षक पी. पी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अभिमन्यू खलसे, वनपाल सतीश बुरकुले, वनरक्षक मनोज कुमावत, वनसेवक भाऊ व्यवहारे आदींच्या पथकाने केली.
फोटो