कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाºयांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:09 AM2018-10-18T00:09:30+5:302018-10-18T00:10:03+5:30

दुष्काळ निवारणाच्या कामामध्ये अधिकारी, कर्मचाºयांनी कुचराई न करता नागरिकांच्या समस्येकडे गांर्भीयाने लक्ष द्यावे या कामात कुचराई केल्यास संबधीताविरुध्द कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.

Action will be taken on the employees who have been crushed into work | कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाºयांवर होणार कारवाई

कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाºयांवर होणार कारवाई

Next
ठळक मुद्देबबनराव लोणीकर : अंबड तालुक्यातील पाणीटंचाई आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : दुष्काळ निवारणाच्या कामामध्ये अधिकारी, कर्मचाºयांनी कुचराई न करता नागरिकांच्या समस्येकडे गांर्भीयाने लक्ष द्यावे या कामात कुचराई केल्यास संबधीताविरुध्द कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.
अंबड येथे गुरुवारी लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाईबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार पासून सर्व शासकीय यंत्रणा टंचाई आढावा तसेच पाहणीच्या कामाला लागण्याचे आदेश पालकमंत्री लोणीकर यांनी बैठकीत दिले.टंचाईच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील चारा इतर जिल्हयांमध्ये नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा घटनावर अंकुश ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहे.जनावरांना लागणारा चारा व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी शासन सर्व स्तरांवर प्रयत्न करत आहे. संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी शेतकºयांनी आपल्या शेतात तीन महिन्यात उत्पादीत होणारा मका, जयवंत, यशवंत तसेच अफ्रिकन गवत आदी प्रकारची चाºयाची लागवड करण्याचे आवाहन यावेळी लोणीकर यांनी केले. यासाठी शासन शेतकºयांना सर्वतोपरी सहाय्य करणार आहे. धरणाचे पाणी, साठवण तलाव, लघुतलाव, भरण आदीव्दारे पाणी उपलब्ध होत असेल तर शेतकºयांनी त्याचा लाभ घ्यावा. शेतकºयांचे वीजबिलाच्या थकीत रकमेसाठी शेतकºयांचा वीज पुरवठा खंडित करु नये अशा सूचना महावितरण अधिकाºयांना लोणीकर यांनी दिली. वेळ पडल्यास शेतकºयांनी निर्मिती केलेला चारा सरकार खरेदी करेल, सरकार शेतकºयांकडून खरेदी केलेला चारा टंचाई ग्रस्त गावांना पुरविणार आहे. यामुळे शेतकºयांनी सुध्दा याकडे लक्ष द्यावे असे लोणीकर यांनी सांगितले. जिल्हयात ६९ टक्के शेतकºयांना कर्जवाटप करण्यात आले आहे, सरकार सर्व शेतकºयांना लवकरात लवकर कर्ज मिळावे या भूमिकेत असतानाही केवळ काही बँकांचा आडमुठेपणा धोरणामुळे शेतकºयांना कर्जपुरवठा होण्यास अडचणी येत असल्याच्या शेतकºयाच्या तक्रारी आहे. यावर बँकाना सूचना दिल्या.

Web Title: Action will be taken on the employees who have been crushed into work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.