स्वाभिमानी संघटनेने दूध रस्त्यावर फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:05 AM2018-07-19T01:05:33+5:302018-07-19T01:05:50+5:30
दुधाला वाढीव पाच रूपयांचा दर द्यावा या मागणीवरून स्वाभिमानी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील बारवाले महाविद्यालय जवळ सकाळी सहा वाजता पुणे येथून परभणीकडे दूध वाहून नेणाºया टँकर अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतून देऊन सरकारचा निषेध नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुधाला वाढीव पाच रूपयांचा दर द्यावा या मागणीवरून स्वाभिमानी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील बारवाले महाविद्यालय जवळ सकाळी सहा वाजता पुणे येथून परभणीकडे दूध वाहून नेणाºया टँकर अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतून देऊन सरकारचा निषेध नोंदविला.
बुधवारी सकाळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवळी, डॉ. ढोरकुले, नामदेव खोसे, बळीराम पुंगळे, निवृत्ती शेवाळे, अशोक मुरकुटे, निवृत्ती घुगे, नामदेव निहाळ, निवृत्ती सानप, रमेश खांडेभराड यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.