उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अवमानना प्रकरणी कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आदोंलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 04:37 PM2019-01-29T16:37:42+5:302019-01-29T16:38:44+5:30

आरोपीस अटक करण्याची मागणी करत लेखणी बंद आंदोलन केले.  

Adalan off the writings of the Deputy District Collector | उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अवमानना प्रकरणी कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आदोंलन

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अवमानना प्रकरणी कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आदोंलन

Next

जालना : दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात एका शेतकऱ्यांने विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यावेळी अनिल चित्तेकर हा निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या अंगावर धावून गेला व शिवागाळ केली. या घटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याने आज निषेध करून आरोपीस अटक करण्याची मागणी करत लेखणी बंद आंदोलन केले.  

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज लेखणी बंद आंदोलन केले. दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने येथील कार्यालयात विषारी द्रव्य प्राशन केले होते. यावेळी अनिल चित्तेकर याने निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांना शिवीगाळ केली व त्यांच्या अंगावर धावून गेला. या घटनेचा येथील कर्मचाऱ्यांनी निषेध करत आज लेखणी बंद आंदोलन केले. कर्मचाऱ्यांच्या या पवित्र्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते.  दरम्यान, सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी संजय चंदन, राजेंद्र शिंदे, गणेश कावळे, विनोद वाघ, संदिप देबडे यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Adalan off the writings of the Deputy District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.