रेमडेसिविर प्रकरणावरून प्रशासनाचे हासे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:29 AM2021-05-14T04:29:42+5:302021-05-14T04:29:42+5:30
या प्रकरणी जिल्हा आरोग्य यंत्रणा गंभीरतेने घेत नसल्याने जालना पुन्हा बदनाम झाले आहे. एक तर हे इंजेक्शन मिळविण्यासाठी कशा ...
या प्रकरणी जिल्हा आरोग्य यंत्रणा गंभीरतेने घेत नसल्याने जालना पुन्हा बदनाम झाले आहे. एक तर हे इंजेक्शन मिळविण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करावे लागतात हे सर्वश्रूत आहे. मूळ किंमत आणि बाहेर मिळत असलेली किंमत यात जमीन आस्मानचा फरक आहे. असे असतांना या महत्वाच्या औषधांकडे दुर्लक्ष केले जात असून, ही अत्यंत गंभीर बाब प्रशासनातील अधिकारी जणू काही झालेच नाही. अशा प्रकारे त्याकडे पाहत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे कोविड रूग्णालयात असलेले सीसीटीव्ही फुटेजवर लक्ष केंद्रीत करतांना प्रशासन गंभीर नसल्यानेच हे शक्य होत असल्याचे दिसून येते. दरम्यान मृत रूग्णाच्या बोटाचे ठसे घेऊन ऑनलाईन रक्कम काढणे हा प्रकारही अत्यंत गंभीर मानला जात आहे. या बद्दल नातेवाईकांनी केलेली तक्रार आधी गंभीरतेने न घेतल्याने यातही पोलीसांना हस्तक्षेप करावा लागला आहे. पहिल्या इंजेक्शनच्या चोरीतील गुंता अद्याप उलगघडला नसतांना आता दुसऱ्यांदा रेमडेसिविरचे प्रकरण पुढे आले आहे.