‘शेततळे’ असूनही अखेर बागांनी ‘दम’ तोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:34 AM2019-06-11T00:34:21+5:302019-06-11T00:35:12+5:30
काही शेतकऱ्यांकडे ‘शेततळे’ असूनही फळ बागांनी ‘दम’ तोडल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अहोरात्र मेहनत करून जोपासलेल्या बागा ऐन उत्पन्नाच्या वयात जळाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे चिंतेन काळवंडले आहेत.
परतूर : काही शेतकऱ्यांकडे ‘शेततळे’ असूनही फळ बागांनी ‘दम’ तोडल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अहोरात्र मेहनत करून जोपासलेल्या बागा ऐन उत्पन्नाच्या वयात जळाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे चिंतेन काळवंडले आहेत.
परतूर तालुक्यात कधी नव्हे ते यावर्षी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवले. विहिरी, बोअर, शेततळी आटली. नवीन बोअर, विहीर घेवूनही पाणी लागले नाही. पाणी पातळी कमालीची घटल्याने पक्के पाणी असलेले जलस्त्रोत हबकले. यामुळे बगायती क्षेत्र धोक्यात आले. काही शेतकरी टँकरने पाणी देवून, शेततळे, ठिबकसह विविध उपाय योजना करून आपल्या बागा आतापर्यंत शेतकºयांनी जोपसल्या. प्रत्येक उन्हाळ््यात शेतकरी पाण्याचे व्यवस्थापण करून आपली बाग जगवतोच, मात्र, या वर्षी शेतकºयांना कडाक्याचे ऊन व पाण्याची अडचण यापुढे हात टेकावे लागले. अनेक उपाय व खर्च करूनही फळबागा जगवता आल्या नाही. घटलेली पाणी पातळी व वाढलेली उन्हाची तिव्रता त्यामुळे थोडे फार पाणी दिले तरी, दुसºयाच दिवशी झाडाचे आळे कोरडे पडू लागले तर, उन्हाच्या तिव्रतेने झाडाची पाने करपू लागली. काही शेतकºयांनी मोसंबी, संत्रा, चिकू या बागा उन्हाळ््यात जगवण्यासाठी शेततळ््यांची व्यवस्था केली आहे. यामध्ये प्लास्टीक तळे प्रभावी ठरले. दरवर्षी हे शेततळे या बागा उन्हाळ््यात जगविण्यासाठी चांगला हातभार लावतात. मात्र, या वर्षी पाण्याचे एवढे दुर्भिक्ष्य निर्माण झाले की, ही तळीच तहानलेली राहीली. या तळ््यात भरपूर पाणी सोडता आले नाही, व जे थोडे बहूत पाणी तळ््यात साठवलेले पाणी या बागांना वाचवू शकले नाही. त्यामुळे दरवर्शी तालुक्यातील कमी होत जाणारे हे मोसंबी, संत्री व ईतर फळ बागाचेही क्षेत्र या वर्षी मोठ्या प्रमाणात घटले आहे.
एकेकाळी या परीसरात हजारो एक्करवर फळबागा डोलत होत्या. उत्पन्नही भरघोस व्हायचे मात्र पावसाचे घटत जाणारे प्रमाण व उन्हाची वाढत जाणारी तिव्रता यामुळे फळबागांची शेती आता शेवटच्या घटका मोजत आहे. दरवर्षी फळबागांना उन्हाळ््यात तारणारे शेततळेही यावर्षी तहानलेले राहील्याने जवळपास साठ टक्के फळबागांनी दम तोडला असल्याचे चित्र आहे.