पाच महिन्यांनंतरही ६० गावांमध्ये समित्या नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 01:01 AM2020-01-24T01:01:21+5:302020-01-24T01:01:41+5:30
अद्यापही ६० गावांमध्ये दारूबंदी समित्या स्थापन करण्यात आल्या नसल्याने या गावांमध्ये अवैध दारू विक्रीबरोबरच तरूण व्यसनाधीन होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : पाच महिन्यांपूर्वी बदनापूर पोलीस ठाण्याअतंर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात दारूबंदी समित्यांची स्थापना करण्याचे निर्देश उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांंनी दिले होते. पाच महिन्यानंतरही पोलीस ठाण्यातंर्गत येणाºया ७६ गावांपैकी १६ गावांमध्येच दारूबंदी समित्या स्थापन करण्यात आल्या. अद्यापही ६० गावांमध्ये दारूबंदी समित्या स्थापन करण्यात आल्या नसल्याने या गावांमध्ये अवैध दारू विक्रीबरोबरच तरूण व्यसनाधीन होत आहे.
गणेशोत्सव काळात बदनापूर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी पोलीस पाटील व शांतता समिती सदस्यांची बैठक घेतली होती. बैठकीमध्ये अनेक गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध दारू विक्रीचा मुद्दा उपस्थित करून अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती़ उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी पोलीस पाटील व शांतता समितीच्या सदस्यांना आपल्या कर्तव्याची जाणिव करून देत गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी गावपातळीवर येत्या आठ दिवसात दारूबंदी समिती स्थापना करावी, अशा सूचना दिल्या होत्या.
समिती स्थापन करण्यासाठी पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, तंटामुक्ती, ग्रापचे पदाधिकारी यांच्यासह अनेकांचा समावेश करण्याचे आदेश दिले होते़ त्यानंतर काही गावांमध्ये समित्या स्थापन झाल्या. परंतु, काही गावांमध्ये अद्यापही समित्या स्थापन नसल्याने अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे़
गावात सहज उपलब्ध होणाºया दारूमुळे अनेक तरूणांना दारूचे व्यसन लागले असून या दारूमुळे अनेकांची भांडणे होत आहे. अनेकांना दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे ते आपल्या कुटुंबाचीही पर्वा करत नाही. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत़ लवकरच समित्या स्थापन करू, असे पोलीस निरीक्षक एम. बी. खडेकर यांनी सांगितले.
पोलीस पाटलांची अनेक पदे रिक्त
तालुक्यात बदनापूर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या ७६ गावांपैकी केवळ २२ गावांमध्ये पोलीस पाटलांच्या जागा भरलेल्या आहे. ५४ गावे पोलीस पाटलाविनाच आहे.
गावात सुरू असलेले अवैध धंदे, गावातील छोट्या- मोठ्या तक्रारींबाबत पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी पोलीस पाटील महत्वाचा दुवा आहे़ परंतु, पोलीस ठाण्यातंर्गत येणाºया अनेक गावांमध्ये पोलीस पाटील नाही. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था सांभाळणाºया पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी होत आहे.