रोहनवाडीनंतर आता सारवाडीत जलसंधारणाचा यज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:43 AM2018-12-31T00:43:00+5:302018-12-31T00:44:06+5:30

जलसंधारणा सोबतच व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियानही येथे यशस्वीपणे राबविण्याची शपथ गावकऱ्यांनी यज्ञ सोहळ्यात घेतली.

After the Rohnwadi, the sacrifice of water conservation is now in Sarwadi | रोहनवाडीनंतर आता सारवाडीत जलसंधारणाचा यज्ञ

रोहनवाडीनंतर आता सारवाडीत जलसंधारणाचा यज्ञ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील अरूणिमा फाऊंडेशने जालना तालुक्यातील रोहनवाडीत तीन वर्षे लोकसहभाग घेऊन जल क्रांती केली आहे. आता हीच लोकचळवळ रोहनवाडीच्या शेजारील सारवाडी गावात होणार असून, त्याचा श्रीगणेशा रविवारी २४ कुंडी गायत्री यज्ञाने झाला आहे. जलसंधारणा सोबतच व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियानही येथे यशस्वीपणे राबविण्याची शपथ गावकऱ्यांनी यज्ञ सोहळ्यात घेतली.
अरूणिमा फाऊंडेशनचे संचालक रघुनंदन लाहोटी, कविता लाहोटी यांनी पुढाकार घेऊन रविवारी विरेश्वर उपाध्याय महाराज - हरिव्दार यांच्या प्रमुख उपस्थितीत सारवाडीत २४ कुंडी गायत्री यज्ञाचे आयोजन करून केली. सकाळी ८ वाजेपासूनच गावातील बहुतांश सर्व ग्रामस्थ या यज्ञ सोहळ्यात सपत्नीक सहभागी झाले होते. यज्ञ म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून, या यज्ञ सोहळ्यातून आपण आपल्या जीवनात कसे परिवर्तन आणू शकतो आणि यज्ञाच्या माध्यमातून केवळ यज्ञात आहुती टाकून मंत्रोच्चार करणे याला तर महत्त्व आहेच, परंतु हा यज्ञ करताना त्यांची सांगता ही चांगल्या कामांचा प्रारंभ करून ते यशस्वी करण्यासही यज्ञ असे संबोधले जाते असे स्पष्टीकरण विरेश्वर महाराजांनी एकेका श्लोकातून समजावून सांगितले.विश्वकल्याण आणि विश्वशांती तसेच जगातील सर्व मानवजातीचे कल्याण आणि उथ्थाला यज्ञातून प्राधान्य दिले जाते. वाईट बाबींचा त्याग करून नवीन आणि मानव कल्याणाच्या बाबींचा संकल्प म्हणजे यज्ञ असतो असेही यावेळी सांगण्यात आले.
सकाळी ८ वाजेपासूनच सारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर २४ कुंड तयार करण्यात आले होते. गावातील प्रत्येक घरा समोर सडा-रांगोळी काढून स्वच्छतेला महत्व देऊन गावातील वातावरण प्रसन्न करण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी शाळेतील मुले-मुली देखील यज्ञ सोहळ्यात हिरीरीने सहभागी झाल्याचे दिसून आले.
विरेश्वर महाराज संस्कृतमधून यज्ञा संदर्भातील मंत्रोच्चार करत असताना कविता लाहोटी या त्याचे मराठीतून महत्त्व समजावून सांगत होत्या. त्यामुळे गावकºयांना आपण यज्ञ का करतो, हे समजण्यास मोठी मदत झाली.
जलसंधारणासोबतच शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, महिलांचे सक्षमीकरणावरही यावेळी भर देण्यात येणार आहे. यावेळी प्रोफेसर काबरा, नम्रता काबरा, डॉ. महेंद्र काबरा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
रोहनवाडी येथील ग्रामस्थांनी आमच्या हाकेला सकारात्मक साथ देत गावाचा चेहरामोहरा बदला असून, तेथील ग्रामस्थांनी सेंद्रिय शेती, गोपालन करून स्वत:सह गावाचा विकास साधला आहे. त्यामुळे रोहनवाडी शिवारालगच असलेल्या सारवाडी येथेही असाच प्रयोग यशस्वी करण्यासाठी आमच्या फाऊंडेशनकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी रविवारी २४ कुंडी गायत्री यज्ञाचे आयोजन करून प्रथम गावकºयांमध्ये चेतना जागविण्याचे काम केले. पुढील वर्षभरात येथे शास्त्रीयदृष्ट्या जलसंधारणाचे काम हाती घेण्यात येणार असून, भूगर्भातील पाणी पातळीचा अभ्यास करून हे काम हाती घेण्यात येणार आहे.
- रघुनंदन लाहोटी,
अध्यक्ष, अरूणिमा फाऊंडेशन

Web Title: After the Rohnwadi, the sacrifice of water conservation is now in Sarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.