कागदपत्र दाखविल्यानंतर ‘ते’ ३५ लाख परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:24 AM2019-03-23T00:24:16+5:302019-03-23T00:25:09+5:30
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भोलखेडा चेकपोस्ट येथे सिल्लोडहून भोकरदनकडे जाणाऱ्या कारमध्ये ३५ लाख रुपये मिळून आले. परंतु, कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हे पैसे परत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भोलखेडा चेकपोस्ट येथे सिल्लोडहून भोकरदनकडे जाणाऱ्या कारमध्ये ३५ लाख रुपये मिळून आले. परंतु, कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हे पैसे परत करण्यात आले.
भोकरदन - सिल्लोड मार्गावरील मालखेडा चेकपोस्टवरील बैठे पथकाने शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता ही कारवाई केली. सिल्लोडहून भोकरदनकडे मारुती कार (क्रमांक एमएच. ०५. ए.एक्स. १९४५) हिची तपासणी केली असता, सदर कारमध्ये ३५ लाख रुपये आढळून आले. त्यानंतर पंचनामाही करण्यात आला. महादूसिंग डोबाळ (रा. भोकरदन) यांनी हे पैसे तिरुपती जिनिंगचे असून त्या संबंधीची सर्व कागदपत्रे दाखविली. त्यानंतर सर्व पैसे परत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.