पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:05 AM2018-11-06T00:05:00+5:302018-11-06T00:05:18+5:30
मागील काही दिवसांपासून अंबड तालुक्यात दरोड्याच्या घटना वाढल्या आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मागील काही दिवसांपासून अंबड तालुक्यात दरोड्याच्या घटना वाढल्या आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
मागील काही दिवसांपासून, अंबड, गोंदी, वडीगोद्री, शहगड, आष्टी परिसरात दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या आदेशाने या परिसरात कोम्बिंग आॅपरेशन राबवण्यात आले होते. परंतु, यानंतरही येथे दरोड्याच्या घटना घडत आहे. त्याच अनुषगांने येथे पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येणार असून, दरोडेखोरांच्या लवकरच मुसक्या आवळल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नियमानुसारच फटाके फोडा
प्रदूषण टाळण्यासाठी प्रदुषण मंहामडळाच्यावतीने फटाक्याची ध्वनी पातळी तपासली जात आहे. शांतता क्षेत्र, रहिवासी, दवाखाना परिसरात ध्वनिमर्यादा आखली आहे. फटाके विक्रेत्यांना अधिक आवाजाचे फटाके विक्री न करण्याचे आदेश आहेत. न्यायालच्याच्या आदेशाचे पालन न केल्यास व रात्री दहा वाजेनंतर फटाके फोडणाऱ्यास व ध्वनिमर्यादेचे उल्लघंन करणा-यावर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाळू माफियांची गय केली जाणार नाही
पोलीस वाळूमाफियांविरोधात करवाई करत असून, ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे. यात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचेही पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी सांगितले.
जिल्हाभरात पोलीस व महसूल प्रशासन वाळू तस्कारांविरुध्द कारवाई करीत आहे. त्यामुळे वाळू माफियांमध्ये गबराटीचे वातावरण पसरले आहे.
आवाहन : दिवाळीत काळजी घ्या
दिवाळीत सुटी मिळाल्यानंतर गावी किंवा इतर ठिकाणी जाताना काळजी घ्यावी. घराला मजबूत कुलूप लावण्याबरोबरच आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती जवळील पोलीस ठाण्याला देणे आवश्यक आहे. तसेच प्रवासादरम्यानही चोरांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले आहे.