बदनापुरात पाकिस्तान विरोधात आंदोलन; बिलावल भुट्टोंचा पुतळा जाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 05:20 PM2022-12-17T17:20:40+5:302022-12-17T17:21:08+5:30
आंदोलकांनी भुट्टो यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून गळफास लावत आग लावली.
बदनापूर ( जालना) : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल जरदारी भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. याच्या निषेधार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाजपतर्फे आज दुपारी आंदोलन करण्यात आले.
बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले . पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी आंदोलकांनी भुट्टो यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून गळफास लावत आग लावली. आंदोलनात हरिश्चंद्र शिंदे, अनिल कोलते, बद्रीनाथ पठाडे, नगरपंचायतचे अध्यक्ष जगन्नाथ बारगजे, उपनगराध्यक्ष शेख समीर, गटनेता बाबासाहेब क-हाळे, नगरसेवक पद्माकर ज-हाड, सत्यनारायण गेलडा, विलास ज-हाड, संतोष पवार, गोरखनाथ खैरे, सय्यद मुज्जमील, भगवान मात्रे, निवृत्ती डाके, भगवान बारगजे, राम पाटील, खरात राजेंद्र, तापडिया संदीप, पवार विष्णू, कोल्हे रघुनाथ, होळकर संजय, वाघमारे अमोल, चव्हाण परमेश्वर, डाके आदींसह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते