ग्रामसेवकांचे जालना जिल्ह्यात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:27 AM2019-08-10T00:27:13+5:302019-08-10T00:27:58+5:30
ग्रासेवक, ग्रामसेविका पद रद्द करून केवळ पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करावी, यासह इतर विविध प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने शुक्रवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले.
जालना : ग्रासेवक, ग्रामसेविका पद रद्द करून केवळ पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करावी, यासह इतर विविध प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने शुक्रवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामसेवकांच्या या आंदोलनामुळे ग्रामपंचायतीतील अनेक कामे ठप्प झाली होती.
ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करावा, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता बदल करून पदवीधर ग्रामसेवक नियुक्त करावेत, सन २०११ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी साजे व पद वाढवावेत, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वेतन त्रुटी दूर करावी, सन २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना सुरू करावी, आदर्श ग्रामसेवक राज्य, जिल्हास्तर, आगाऊ वेतनवाढ करून एक गाव एक ग्रामसेवक निर्मिती करावी, ग्रामसेवकाकडील अतिरिक्त कामे कमी करावीत आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आॅगस्ट क्रांतीदिनी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास १३ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन, निदर्शने करण्यात येतील.
तसेच पुढील कालावधीत विविध मार्गांनी आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
अंबड येथेही आंदोलन करण्यात आले. आंदोलनात तालुकाध्यक्ष व्ही.एम.राठोड, सचिव शेख सालार शे. हुसेन, महिला उपाध्यक्षा जी.आर. वल्ले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.
जाफराबादमध्ये आंदोलन
जाफराबाद : तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने आपल्या न्याय मागण्यांसाठी येथील पंचायत समिती कार्यलयासमोर शुक्रवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे एस. डी. शेळके, व्ही. व्ही. जयभाये, एल. एन. धुमाळ, ई. डी. काळे, पी. पी.पडघन, ए. ए. डोईफोडे, आर. बी. जाधव, डी. के. मेहत्रे, आर. एम. कंकाळ, व्ही. पी. बाहेकर, एम. आर. डोईफोडे, एन. एल. चौधरी, व्ही. पी. बोबडे, व्ही. आर. देशमुख, जे.यू. आढाव, ए. ए. शेख, एस. पी. लोखंडे आदी उपस्थित होते.
परतूर : मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन
परतूर : ग्रामसेवक संघटनेच्या वतीने शुक्रवारी विविध मागण्यांसाठी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
यावेळी तालुकाध्यक्षबाबासाहेब चव्हाण, डी. बी. काळे, एस. के. शेख, ई. टी. मुरदकर, पठाण, एस. एम. माने, नामदेव काळे, ए.बी. मेहत्रे, व्ही. एस. वानखेडे, ई.यू. दडमल, एम.आर. काकडे, पी.एस. ठोंबरे, सुप्रीया उपरवाड, सुवर्णा चाटे, गंगासागर गायकवाड, सारीका बसवदे, अर्चना राउत, आम्रपाली घागरमाळे, बि. एस. राउत, व्ही. जी. पिंपळे, एस. एम. अंभोरे, यु.एस. अंभूरे, ए. बी.सोळंके, पी. एस. ठोंबरे, बि. एन. बरकु ले यांच्यासह ग्रामसेवक उपस्थित होते.