जालन्यात आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 05:52 PM2019-02-01T17:52:08+5:302019-02-01T17:52:08+5:30
मोटार वाहन विभागाच्या कर्मचारी संघटनेतर्फे आज लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
जालना : परिवहन विभागातील कर्मचारी आकृतीबंध, कार्यालयीन रचनेसह विविध प्रलंबीत मागण्यासाठी जालना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन विभागाच्या कर्मचारी संघटनेतर्फे आज लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलनामुळे आरटीओ कार्यालयातील विविध काम बंद आहेत. त्यामुळे जिल्हाभरातून आलेल्या वाहनधारकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. दररोज खिडक्यांवर रांगा लागतात मात्र आज कार्यालयात सामसूम आहे. याप्रसंगी आरटीओ अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे के. एस. म्हस्के, आर. आर. जाधव, अनीस, आर. व्ही. साबणे, डी. एम. डिगोत, सानप, भावसार आदी उपस्थित होते.