सिपोरा बाजार येथे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:50 AM2018-08-03T00:50:10+5:302018-08-03T00:50:22+5:30
भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे सकाळी १० वाजेच्या सुमारास भोकरदन- जाफराबाद रस्त्यावरील सिपोरा बाजार फाट्यावर सकल मराठा समाजाच्यावतीने रस्त्यावर टायर जाळून रस्तारोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिपोरा बाजार : भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे सकाळी १० वाजेच्या सुमारास भोकरदन- जाफराबाद रस्त्यावरील सिपोरा बाजार फाट्यावर सकल मराठा समाजाच्यावतीने रस्त्यावर टायर जाळून रस्तारोको आंदोलन केले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्य शासनाचा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या. या मुख्य मागणीसाठी सकल मराठा समाजाचा लढा सुरू आहे. या मोर्चाला सिपोरा बाजार येथील मुस्लीम समाजाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.
आंदोलनकर्त्यांच्यावतीने तहसीलदार काशीनाथ तांगडे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देण्यात आले. या रस्तारोकोमुळे भोेकरदन, जाफराबाद, बुलढाणा तसेच विदर्भाकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सिपोरा बाजार येथे गुरुवारी मुंडण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सिपोरा बाजारसह पंचक्रोशीतील सकल मराठा बांधवांनी सहभाग नोंदवून ३०३ जणांनी मुंडण केले.