परतूर शहरात कडकडीत बंद..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:11 AM2018-07-22T00:11:12+5:302018-07-22T00:11:49+5:30
मराठा आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून, शनिवारी परतूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर शाळा महाविद्यालयही लवकर सोडून देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : मराठा आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून, शनिवारी परतूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर शाळा महाविद्यालयही लवकर सोडून देण्यात आली.
मराठा आरक्षणासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मराठा समाज बांधवांच्यावतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. भर पावसातही हे आंदोलन करण्यात आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी विविध संघटना व पक्षांनी शनिवारी परतूर बंदचे आवाहन केले होते.
या अवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी बांधवांनी कडकडीत बंद पाळला. तसेच शाळा महाविद्यालयेही लवकर सोडून देण्यात आली. त्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती आता वाढत आहे. जोपर्यंत मराठा क्रांती मोर्चातील मागण्या शासन मान्य करीत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या आंदोलनास जालना जिल्हा काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक काँगे्रस पार्टी, मुस्लिम समाज, व्यापारी महा संघ, परतूर यांनी पाठिंबा देत बंदचे आवाहन केले होते.
जालना : पूर्वतयारीसाठी आज बैठक
जालना शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी काढण्यात येणाऱ्या मराठा ठोक मोर्चासह टप्याटप्यात होणा-या आंदोलनाबाबत जालना शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवांची रविवार सकाळी ११ वा. भाग्यनगर परिसरातील मराठा सेवा संघ कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत मोर्चाची रूपरेषा ठरविली जाणार आहे. शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी या बैठकीत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवारी जिल्ह्यातील समन्वयकांची बैठक पार पडली. या बैठकीला १००० पेक्षा जास्त युवकांची उपस्थिती होती. मंगळवारी होणाºया मोर्चात समाजाच्या नावावर मोठे झालेले आमदार, खासदार बोटचेपीची भूमिका घेत आहेत म्हणून या मोर्चात १६१ आमदार व मराठा खासदारांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. या मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन व दुसºया दिवशी सरकारी कार्यालयांना घेराव व तिस-या दिवशी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे मोर्चा समन्वय समितीने कळविले आहे.