जालन्यात अग्नितांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:14 AM2019-06-01T00:14:00+5:302019-06-01T00:16:21+5:30
नवीन एमआयडीसीतील मंत्री यांच्या भक्ती एक्ट्रक्शनला शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शॉटसर्किटमुळे आग लागली.
जालना : नवीन एमआयडीसीतील मंत्री यांच्या भक्ती एक्ट्रक्शनला शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शॉटसर्किटमुळे आग लागली. ज्या मोठ्या गोदामात पशुखाद्य साठवून ठेवले होते. ते या आगीत भस्मसात झाले. यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती मंत्री यांनी अग्3िा्नशमन दलाला दिली. ही आग विझवण्यासाठी औरंगाबाद, परतूर आण जालन्यातील अशा सात अग्निशमन बंबाचा उपयोग करावा लागला. यावरून ही आग किती मोठी होती याचा अंदाज येतो.
जालन्यातील जालना ते औरंगाबाद मार्गावरील नवीन औद्योगिक वसहातीत भक्ती एक्सट्रक्शन ही पशुखाद्य अर्थात ढेप तयार करणारी कंपनी आहे. तसेच याच कंपनीच्या आवारात आॅईलमिल असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. सकाळी पाच वाजेच्या सुमारास कंपनीच्या गोदामातून मोठ्या प्रमाणावर धूराचे लोट निघत असल्याचे लक्षात आले. ही माहिती तातडीने अग्निशमन दलाला कळवण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, तीन बंब आणले.
परंतु आग मोठी असल्याने औरंगाबाद येथील महानगर पालिकेचे दोन आणि परतूर येथील नगर पालिकेची एक असे सहा बंब तैनात करण्यात आले होते.
अग्निशमन बंब येण्यापूर्वी परिसरातील नागरिकांनी खासगी टँकर आणून आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
विशेष महणजे जालन्यात तर अग्निशमन दलाला कोणताच अधिकारी नसतांना आहेत, त्या कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी निलेश ढाकणे, अशोक वाघमारे, दत्ता मोरे, बासिद खान, संजय हिरे, पंजाबराव देशमुख, प्रविण दराडे, नागेश घुगे, विठ्ठल कांबळे, प्रमोद राजपूत, नदीम चौधरी आदींनी ही आग नियंत्रणात आणली.
विहीर आली मदतीला धावून : औरंगाबाद, परतूरहून बंब मागविले
४अग्निशमन दलाच्या बंबांना पाणी भरण्यासाठी कंपनीच्या जवळच असलेल्या विहिरीचा मोठा आधार मिळाल्याचे सांगण्यात आले. एकूणच ही आग लागल्याची माहिती मिळाल्यावर मंत्री परिवारातील सर्व सदस्य तसेच त्यांचा मित्र परिवार घटनास्थळी पोहचला होता.
४ज्या गोदामाला आग लागली ते गोदाम खूप मोठे होते. आगीमुळे गोदामाचे छत जळून खाक झाले. तर आग विझवण्यासाठी जेसीबीच्या मदतीने गोदामच्या भिंती पाडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
४ज्या कंपनीच्या गोदामाला आग लागली होती. त्याच्या शेजारी असलेल्या जुन्या विहिरीमुळे आग विझविण्यासाठी तातडीने पाणी उपलब्ध झाल्याची माहिती दिली.