अजय गुप्ता यांनी केली कांदा बीजोत्पादनाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:29 AM2021-03-06T04:29:23+5:302021-03-06T04:29:23+5:30
कृषी विज्ञान केंद्राद्वारे दरवर्षी राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालयामार्फत करार पद्धतीने बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो. यावर्षी खरपुडी येथील ...
कृषी विज्ञान केंद्राद्वारे दरवर्षी राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालयामार्फत करार पद्धतीने बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो. यावर्षी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात तीन एकर क्षेत्रावर बीजोत्पादन घेण्यात आले. याची पाहणी डॉ. गुप्त यांनी केली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने, जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे अधिकारी पवन बैनाडे, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक देशमुख यांची उपस्थिती होती. खरपुडी केंद्रातील पाहणीनंतर त्यांनी शिवणी गावाला भेट देऊन प्रगतशील शेतकरी उद्धव खेडेकर यांनी लागवड केलेल्या कांदा बीजोत्पादनाची पाहणी केली. उत्कृष्ट आणि पूर्ण शास्त्रीय आधारावर अत्यंत कमी पाण्यात आलेले पीक पाहून डॉ. गुप्ता यांनी समाधान व्यक्त केले. उपलब्ध क्षेत्रातून अंदाजे १०० क्विंटल बीजोत्पादन होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. उद्धव खेडेकर हे कांदा पिकातील एक अभ्यासू शेतकरी असून, त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. परागीकरणासाठी त्यांनी जागोजागी मधमाशा पेट्या व त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याचे सुद्धा केली आहे.
===Photopath===
050321\05jan_1_05032021_15.jpg
===Caption===
शिवणी येथे कांदा बीजोत्पादनाची पाहणी करताना अजय गुप्ता व इतर.