सगळं काही हिरावलं, तरीही आनंदाने जगतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:27 AM2018-02-17T00:27:51+5:302018-02-17T00:27:58+5:30
लग्नानंतर सगळं काही सुरळीत सुरू असताना एचआयव्हीने आनंदच हिरावून घेतला. या आजारामुळे आधी नवरा आणि नंतर मुलगा गेला. त्यामुळे जगण्याची उमेदच गेली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने यातून वाचले. या धक्क्यानंतरही आज आनंदाने आयुष्य जगत असताना इतरांनाही मदत करत आहे, असे मनाला गोठवून टाकणारा अनुभव जामखेड येथील रत्नमाला चव्हाण-जाधव यांनी कथन केला.
जालना : लग्नानंतर सगळं काही सुरळीत सुरू असताना एचआयव्हीने आनंदच हिरावून घेतला. या आजारामुळे आधी नवरा आणि नंतर मुलगा गेला. त्यामुळे जगण्याची उमेदच गेली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने यातून वाचले. या धक्क्यानंतरही आज आनंदाने आयुष्य जगत असताना इतरांनाही मदत करत आहे, असे मनाला गोठवून टाकणारा अनुभव जामखेड येथील रत्नमाला चव्हाण-जाधव यांनी कथन केला.
जेईएस महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने आयोजित १४ व्या राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिरात ‘माझा जीवन अनुभव’ या अनुभव कथनात त्या शुक्रवारी बोलत होत्या. रत्नमाला म्हणाल्या, अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी खंडेश्वरी नावाचे माझे गाव. वयाच्या पंधराव्या वर्षी पनवेल येथील एका वाहनचालकाशी माझे लग्न झाले. आनंदाने संसार सुरू असताना दीड वर्षानंतर पती सारखे आजारी पडू लागले. बाळंतपणासाठी माहेरी आले असता नवºयाची प्रकृती खालावली. बाळांतपणानंतर मी मुलाला घेऊन सासरी गेले. नवºयाला एचआयव्हीची लागण झाल्याचे कळल्यानंतर मला धक्काच बसला. त्यानंतर मलाही एचआयव्ही संक्रमण झाल्याचे निष्पण्ण झाले. सोसायटी सोडून नवºयाच्या गावी आलो. तिथेही त्रास झाला. शेतात राहायला गेलो. प्रकृती खालावल्याने २००१ मध्ये पतीचा मृत्यू झाला. पती गेल्यानंतर माहेरी आले. आईसोबत राहू लागले. तिला आजाराबद्दल कळल्यानंतर तिनेही नाकारले. गावात कुणी कामही देईना. एकेदिवशी अकरा महिन्यांचे बाळ मरुन पडलेले होते. नवरा गेला, मुलगाही गेला, मग जगायचे कशासाठी म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातच जामखेडच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पात काम करणाºया एका आरोग्य सेविकेने माझा परिचय डॉ. रजनीकांत आरोळे यांच्याशी करून दिला. औषधोपचार सुरू झाले. डॉ. आरोळे यांनी माझी मुलीप्रमाणे काळजी घेतली. जन्मदात्या आईने नाकारले, सासू-सासºयांनी घराबाहेर काढले.
समाजाने हेटाळणी केली. मात्र, डॉ. आरोळेंसारख्या देवदुताने मला जगण्याचा एक प्रकाश किरण दाखवला, असे मनाला गोठवून टाकणारे अनुभव रत्नमाला यांनी सांगितले. त्यांची ही संघर्ष कहाणी ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले.