आॅल इंडिया मुशायरा कार्यक्रम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:47 AM2018-11-30T00:47:52+5:302018-11-30T00:48:15+5:30

मौलाना अबुल कलाम आझाद, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि शहीदे हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या स्मरणार्थ नुकतेच येथील महेबूबनगर येथे आॅल इंडिया मुशायराचे आयोजन करण्यात आले होते

The All India poetry programme | आॅल इंडिया मुशायरा कार्यक्रम उत्साहात

आॅल इंडिया मुशायरा कार्यक्रम उत्साहात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : मौलाना अबुल कलाम आझाद, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि शहीदे हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या स्मरणार्थ नुकतेच येथील महेबूबनगर येथे आॅल इंडिया मुशायराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आ. राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरामध्ये प्रथमच मुशायरा रसिक प्रेमिंसाठी आॅल इंडिया मुशायराचे आयोजन करण्यात आलते. यासाठी विविध जिल्ह्यातून आणि परिसरातून दर्दी रसिकांनी उपस्थिती नोंदविली होती.
यावेळी डॉ. हिकमत उढाण, बबलू चौधरी, निसार देशमुख, इक्बाल पाशा, रशीद पहेलवान, विनायक चोथे, देविदास कुचे, शेखर मोहरीर, शहाआलम खान, भागवत कटारे, इक्बाल कुरेशी, समद बागवान, शिवप्रसाद चांगले, सतीश होंडे, अ‍ॅड. संजय काळबांडे, दीपक ठाकूर, औदुंबर बागडे, खुर्शिद जिलानी, जाकेर डावरगावकर, विशाल बुधवंत, हाफिज चाऊस, डॉ. शरफोद्दिन शेख यांची उपस्थिती होती.
या मुशायरामध्ये प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा (लखनऊ, उत्तरप्रदेश), शम्स जालन्वी, अबरार काशिफ, जोहर कानपुरी (कानपूर), नईम अख्तर खादमी (बुºहाणपूर), वाहेद अंसारी (मालेगाव), उस्मान मिनाई (बाराबंकी,वढ), नईम फराज (अकोला), आदिल रशीद (दिल्ली), मुश्ताक अहेमद मुश्ताक (मालेगाव), नूर ढोलपुरी, डॉ. मोईन अमर बंबू (हैदराबाद), जलाल महेकश, रागीब बयावली, सुंदर मालेगावी, अजीम देवासी, अनस नबील, स. असरारूल हक कमर हे शायर सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी अ‍ॅड. अफरोज पठाण, अलियान चाऊस, सोहेल अहेमद, शाम्म्द शेख, मुज्जमील खान, सलीम बागवान, पठाण, हाकिम पटेल, समीर शेख, गालेब बाशन, मुश्ताक बागवान, युनुस तांबोळी, सिकंदर पठाण आदींनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा हे होते. आपल्या वेगळ््या प्रकारच्या शैली मध्ये त्यांनी विविध गजल आणि शेरो शायरी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मुन्नवर राणांनी सांगितले की, तमाम उम्र हम एक दुसरे से लढते रहे, मगर मरे तो बराबर मे जाके लेट गये. त्यांनी विविध शायरी आणि गजल मधून नैतिक मूल्यशिक्षण, मानवता संदेश, सामाजिक जबाबदाऱ्या, स्त्री भ्रूणहत्या आदींवर प्रकाश टाकला. रसिकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे दाद दिली.

Web Title: The All India poetry programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.