पारदर्शक निवडणुकीसाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे - अब्दुल समद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:29 AM2019-04-10T00:29:00+5:302019-04-10T00:29:19+5:30
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन निवडणूक निरीक्षक अब्दुल समद यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शकरीत्या यशस्वी करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने सर्व उमेदवारांनी, राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे. त्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांसोबतच आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन निवडणूक निरीक्षक अब्दुल समद यांनी येथे केले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांना विविध बाबी, नियमांचे मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी समद बोलत होते. यावेळी कायदा व सुव्यवस्था निरीक्षक शाहनवाज कासिम, निवडणूक खर्च निरीक्षक पवनकुमार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजीव नंदकर, उप विभागीय अधिकारी केशव नेटके यांच्यासह विविध उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
समद म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शी होण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक आयोगाने विविध पथकांची स्थापना केली आहे.