भाजप वाढवण्यासह युती धर्म पाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:27 AM2019-08-22T00:27:02+5:302019-08-22T00:27:55+5:30

देशात आज भाजप हा क्रमांक एकचा पक्ष आहे, आपण पक्षवाढीसह युती धर्म पाळण्यावर भर देणार आहोत.

Alliance will follow with increasing BJP | भाजप वाढवण्यासह युती धर्म पाळणार

भाजप वाढवण्यासह युती धर्म पाळणार

Next
ठळक मुद्देसंतोष दानवे : जालना जिल्हाध्यक्षपदाचा बुधवारी स्वीकारला पदभार

जालना : देशात आज भाजप हा क्रमांक एकचा पक्ष आहे, आपण पक्षवाढीसह युती धर्म पाळण्यावर भर देणार आहोत. यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शनही महत्वाचे ठरणार आहे. अत्यंत तरूण वयात पक्षाने माझ्यावर मोठी जबाबादी सोपवली आहे. वरिष्ठांचा विश्वास आपण सार्थ ठरवून आगामी निवडणूकीत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात युतीचे उमेदवार कसे विजयी होतील यासाठी आपले प्राधान्य राहील, असे प्रतिपादन जालना जिल्हा भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष आ. संतोष दानवे यांनी बुधवारी केले.
येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात संतोष दानवे यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार मावळते जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे यांच्याकडून स्विकारला यावेळी संपर्क मंत्री भाऊसाहेब देशमुख यांच्यासह आ. नारायण कुचे, शहराध्यक्ष सिध्दीविनायक मुळे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपाध्यक्ष तथा नगरसेवक भास्कर दानवे, गटनेते अशोक पांगारकर, सरचिटणीस देविदास देशमुख, भाऊसाहेब कदम, जिल्हा उपाध्यक्ष किशोर अग्रवाल, घनश्याम गोयल, वसंत जगताप, ज्ञानेश्वर शेजूळ, राजेंद्र देशमुख, देवनाथ जाधव, धनराज काबलिये, सतीश जाधव, नगरसेविका संध्या देठे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना संतोष दानवे म्हणाले की, जिल्ह्यात युतीला पोषक वातावरण आहे. माझे वडील तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गेल्या पाच वर्षात विविध विकास कामे करून जिल्ह्याला प्रगतीपथावर नेले आहे. आगामी काळात आपण या सर्वांचे मार्गदर्शन घेऊन जास्तीत जास्त युवकांना पक्षा सोबत जोडण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी भाऊसाहेब देशमुख, रामेश्वर भांदरगे यांनीही विचार व्यक्त केले.

Web Title: Alliance will follow with increasing BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.