अंबड तालुक्यात गौण खनिजाचे उत्खनन करणारे दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 05:17 PM2018-09-25T17:17:30+5:302018-09-25T17:18:04+5:30
अवैधरित्या गौण खनिजाची साठवण करण्याऱ्या दोन आरोपींना अबंड पोलीसांनी अटक केली.
जालना : अबंड तालुक्यातील नांदी येथे अवैधरित्या गौण खनिजाची साठवण करण्याऱ्या दोन आरोपींना अबंड पोलीसांनी अटक केली. शहाबुद्दीन सय्यद उस्मान ( ७० रा. नांदी), सय्यद मन्सूर सय्यद रसूल ( रा. नांदी ता. अबंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
अबंड पोलीसांना खबऱ्यामार्फेत माहिती मिळाली की, नांदी येथे दोन जण अैवद्यरित्या गौण खनिजाची खनिजाची साठवण करत आहेत. यावरुन पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी कर्मचाऱ्यासह नांदी येथे कारवाई केली. यात शहाबुद्दीन सय्यद उस्मान व सय्यद मन्सूर सय्यद रसूल यांच्या घराची तपासणी केली असता, त्यांच्या घरातून मौल्यवान रंगीत ( गारगोटी) दगड आढळून आला. पोलीसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे पोउपनि. एन. शेख, घेवनदे, सदीप कुटे, पवार यांनी केली.